भीमाशंकर कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम - दिलीप वळसे पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:26 AM2018-09-28T00:26:39+5:302018-09-28T00:27:02+5:30
भीमाशंकर साखर कारखान्याचे कामकाज पारदर्शकपणे चालू असल्याने कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे. आगामी येणाऱ्या गाळप हंगामासाठी भीमाशंकर कारखान्याकडे उसाची दहा लाख टनाची नोंदणी झाली आहे.
अवसरी - भीमाशंकर साखर कारखान्याचे कामकाज पारदर्शकपणे चालू असल्याने कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे. आगामी येणाऱ्या गाळप हंगामासाठी भीमाशंकर कारखान्याकडे उसाची दहा लाख टनाची नोंदणी झाली आहे. पाणीटंचाई व हुमणी किडीचा प्रादुर्भाव आणि इतर कारणामुळे साडेआठ लाख टन उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. अशी माहिती भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली .
दत्तात्रयनगर पारगाव येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा एकोणिसाव्या बॉयलर अग्निप्रदीपन आणि गव्हाणपूजन कार्यक्रमाप्रसंगी भीमाशंकर साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीप वळसे पाटील बोलत होते. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, काकासाहेब पलांडे, मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, उपसभापती नंदकुमार सोनावले, जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात, पंचायत समिती सदस्य संतोष भोर, सुषमा शिंदे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, बाबासाहेब खालकर, रमेश लबडे, शांताराम हिंगे, दगडू शिंदे, उत्तमराव थोरात, बाळासाहेब घुले, ज्ञानेश्वर गावडे, रामचंद्र ढोबळे, दादाभाऊ पोखरकर, बाळासाहेब थोरात, अण्णासाहेब पडवळ, भगवान बोºहाडे, तानाजी जम्बुकर, ज्ञानेश्वर आस्वारे, कल्पना गाढवे, मंदाकिनी हांडे, रमेश कानडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे उपस्थित होते .
हुमणी किडीच्या प्रादुर्भावामुळे येणारा साखर हंगाम धोक्यात आला आहे. साखर बाजारभावातील चढ-उतार यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. असे सांगून दिलीप वळसे पाटील म्हणाले भीमाशंकर कारखान्याचा गळीत हंगाम १ आॅक्टोबर रोजी चालू करण्याचे धोरण आहे. कारखान्याने गाळप हंगामाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. हुमणी किड आणि पावसाचे अत्यल्प प्रमाणामुळे राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यासाठी कारखान्यांनी खर्चात काटकसर करावी. बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर व त्यांची पत्नी मंगल खालकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी संत महंत यांचा सत्कार करण्यात आला .ह. भ .प. अशोक महाराज काळे, हिरामण महाराज कर्डिले ,शंकर महाराज शेवाळे, राजाराम महाराज जाधव , गणेश महाराज वाघमारे,माजी आमदार पोपटराव गावडे यांची भाषणे झाली.