रिंग रोडसाठीची आर्थिक तरतूद बांधकाम व्यवसायासाठी फायद्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:14 AM2021-03-09T04:14:10+5:302021-03-09T04:14:10+5:30
- सुहास मर्चंट अध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो --- नवीन घर घेताना घरातील महिला सदस्याच्या नावावर नोंदणी केल्यास मुद्रांक शुल्कात ...
- सुहास मर्चंट अध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो
---
नवीन घर घेताना घरातील महिला सदस्याच्या नावावर नोंदणी केल्यास मुद्रांक शुल्कात १% इतकी सवलत मिळणार, ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे, यामुळे ग्राहकांमध्ये घर खरेदीसंदर्भात असलेला उत्साह काही काळ टिकून राहील असे वाटते. गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या वेळी मुद्रांक शुल्कामध्ये सवलत दिल्या गेली तेव्हा त्याचा घर खरेदीवर सकारात्मक परिणाम दिसून आला़ त्याचप्रमाणे याही निर्णयाचा नवीन घर खरेदीवर चांगला परिणाम होईल, अशी माझी अपेक्षा आहे. तसेच रिंग रोडसाठी २४ हजार कोटी रुपयांची केलेली तरतूद ही भविष्यात पुण्यात गृहनिर्माण क्षेत्रात नवीन संधी निर्माण करू शकेल, अशी मला आशा आहे.
- विनीत गोयल, सह-व्यवस्थापकीय संचालक, कोहिनूर समूह