घटस्फोटानंतरही वडिलांनी स्विकारली मुलीची आर्थिक जबाबदारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 05:04 PM2018-08-03T17:04:02+5:302018-08-03T17:05:55+5:30

सुरेश आणि सुरेखा (नावे बदलली आहेत) २०१२ मध्ये यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला.लग्नानंतर काही दिवस त्यांनी व्यवस्थित संसार केला. काही काळानंतर त्यांच्यात वैचारिक मतभेद होऊ लागले.

financial responsibility of girl by father after divorce | घटस्फोटानंतरही वडिलांनी स्विकारली मुलीची आर्थिक जबाबदारी 

घटस्फोटानंतरही वडिलांनी स्विकारली मुलीची आर्थिक जबाबदारी 

Next
ठळक मुद्देमुलीच्या दैनंदिन गरजा आणि शिक्षणासाठी खर्च उदभवल्यास मदत करण्याचेही मान्य

पुणे : घटस्फोट म्हणजे तसा दु:खद अनुभव असतो. त्याचे तीव्र पडसाद आर्थिक, सामाजिक , कौटुंबिक अशा सर्वच पातळीवर दोन्ही बाजूने उमटत असतात. यामध्ये होणारी मुलांची फरफट तर अतिशय केविलवाणी असते. आयुष्यातील विविध प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभे असतात. मात्र, समंतीने घटस्फोट घेऊनही मुलीच्या भवितव्याचा विचार करत तिच्यासाठी गुंतवणूक करून ठेवल्याचा आदर्श एका दाम्पत्याने निर्माण केल्याची दुर्मीळ घटना पुण्यात पाहायला मिळाली. 
     कौटुंबिक न्यायालयात नुकताच एका उच्चशिक्षित दाम्पत्याचा घटस्फोट झाला. दाखलपूर्व समुदेशनामध्ये दोघांनी त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीच्या भविष्याचा विचार करण्यास लावले. त्यानुसार पतीने घटस्फोटाच्या वेळी पत्नीला १५ लाख रुपये आणि दागिने दिले. तसेच मुलीच्या भवितव्याचा विचार करीत तिच्यासाठी दरमहा आठ हजार रुपये म्युच्युल फंडात गुंतवण्याचे मान्य केले आहे. एवढेच नाही तर पाच वर्षांनंतर मुलीच्या नावे दरमहा १५ हजार रुपये गुंतवण्याचेही पित्याने कबुल केले आहे. जमा झालेले पैसे काढण्याचे अधिकार पत्नी आणि मुलीला देण्यात आला आहे. मुलीच्या दैनंदिन गरजा आणि शिक्षणासाठी खर्च उदभवल्यास चर्चा करून मदत करण्याचेही त्याने मान्य केले आहे. त्यामुळे मुलीचे भवितव्य सुरक्षित बनले आहे. पैशांसाठी तिला कोणावर अवलंबून रहावे लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयात नुकताच हा परस्पर संमतीने घटस्फोट झाला. दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. गणेश कवडे यांनी दोघांचे दाखलपूर्व समुपदेशन केले. 
         सुरेश आणि सुरेखा (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. २०१२ मध्ये त्यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला. सुरेश सैन्यात मेजर असून सध्या बंगळुरू येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. पत्नी सुरेखा ही गृहिणी असून पुण्यात राहते. लग्नानंतर काही दिवस त्यांनी व्यवस्थित संसार केला. दरम्यान, त्यांना एक मुलगी झाली. काही काळानंतर त्यांच्यात वैचारिक मतभेद होऊ लागले. त्यातून वाद विकोपाला गेले. त्यातून आॅगस्ट २०१६ पासून दोघे वेगळे राहु लागले. दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अ‍ॅड. कवडे यांच्यामार्फत दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला. त्यापूवी कवडे यांनी दोघांचे दाखलपूर्व समुपदेशन केले. 
कवडे म्हणाले, दोघे एकत्र यावेत यासाठी सुरुवातीला प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यातील मतभेदामुळे ते एकत्र येऊ शकले नसते. त्यामुळे दोघांचा परस्पर संमतीने घटस्फोटाविषयी अर्ज करण्याचे मान्य केले. त्यापूर्वी तीन वर्षाच्या मुलीच्या भवितव्याविषयी विचार करण्यास दोघांना सांगितले. पतीने तिचा आर्थिक भार उचलला पाहिजे. हे दोघांना पटवून दिले. त्यामुळे सुरेश यांनी तिच्या भवितव्यासाठीचा खर्च उचलण्याचे मान्य केले.  
...................

Web Title: financial responsibility of girl by father after divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.