मुलीच्या लग्नात दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ; पुण्यातील उद्याेजकाचे स्तुत्य पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 07:30 PM2018-12-31T19:30:04+5:302018-12-31T19:31:51+5:30

पुण्यातील उद्याेजक असलेल्या श्रीधर जाेशी यांनी आपल्या मुलीच्या लग्नात दुष्काळग्रस्त भागातील 10 विद्यार्थ्यांना मेससाठी आणि इतर खर्चासाठी आर्थिक मदत केली आहे.

Financial support to drought-hit students in daughters marriage; inspiring step of punes business person | मुलीच्या लग्नात दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ; पुण्यातील उद्याेजकाचे स्तुत्य पाऊल

मुलीच्या लग्नात दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ; पुण्यातील उद्याेजकाचे स्तुत्य पाऊल

Next

पुणे : मुलीचं लग्न म्हंटलं की माेठ्या थाटामाटात करण्याकडे अनेकांचा कल असताे. पाहुण्यांची बडदास्त ठेवण्यापासून ते चायनीज पासून ते साऊथ इंडियन डिशेसची मेजवाणी ठेवली जाते. परंतु पुण्यातील उद्याेजक असलेल्या श्रीधर जाेशी यांनी आपल्या मुलीच्या लग्नातदुष्काळग्रस्त भागातील 10 विद्यार्थ्यांना मेससाठी आणि इतर खर्चासाठी आर्थिक मदत केली आहे. जाेशी यांनी लग्नातील अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या पाऊलाचे सर्वच स्तरातून आता काैतुक हाेत आहे. 

    यंदा मराठवाडा भीषण दुष्काळाच्या छायेत आहे. मराठवाड्यातील लाखाे विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेत आहेत. दुष्काळामुळे पिकं करपल्याने या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा उदनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकांना मुलांना पुण्यात पैसे पाठवणे अशक्य झाले आहे. परिणामी हजाराे विद्यार्थ्यांना अर्धपाेटी राहूनच शिक्षण घ्यावे लागत आहे. या विद्यार्थ्यांच्या मदतीला पुण्यातील सामाजिक कार्यकर्ता कुलदीप आंबेकर पुढे आला. कुलदीपने हेल्पिंग हॅण्ड ही संस्था सुरु करुन दुष्काळीभागातील विद्यार्थ्यांच्या मेसचा आणि इतर खर्च भागविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून मदत गाेळा करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता अनेक लाेक मदतीसाठी पुढे आले. जाेशी यांना सुद्धा दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मदत करायची हाेती. अर्धपाेटी बुद्धी चालत नाही याची त्यांना जाणीव हाेती. त्यांचे मित्र सचिन ईटकर यांच्या मदतीने त्यांना हेल्पिंक हॅण्ड या संस्थेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी या संस्थेच्या 10 गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे त्यांनी तब्बल 1 लाख रुपयांची मदत या मुलांना केली. 

    जाेशी म्हणाले, मला मुलीच्या लग्नात एखाद्या सामाजिक उपक्रमाला मदत करायची हाेती. याबाबत मी सचिन इटकर यांच्याशी बाेललाे. त्यांनी मला हेल्पिंग हॅण्ड या संस्थेबद्दल सांगितले. त्यानंतर मी 10 मुलांना मदत करण्याचा निर्णय घेतला. मी या आधी शिक्षक म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे उपाशी पाेटी बुद्धी चालत नाही हे मी पाहिलं आहे.  समाजाचं आपण काहीतरी देणे लागताे या भावनेतून मी मदत करण्याचा निर्णय घेतला. यातून इतरांनाही आपण समाजातील गरजुंना मदत केली पाहिजे हा संदेश मिळणार आहे. तसेच माेठा खर्च करुन लग्न करण्यापेक्षा गरजू विद्यार्थ्यांना मदत केली तर तुम्ही वाजवलेल्या लाखभर रुपयातून त्या मुलांच्या सहा महिन्याच्या मेसचा खर्च वाचविता येताे हा विचारही लाेक यापुढे करतील अशी आशा आहे.

Web Title: Financial support to drought-hit students in daughters marriage; inspiring step of punes business person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.