प्रश्नांची उत्तरे शोधा; व्यवसाय सापडतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 01:41 AM2018-02-23T01:41:08+5:302018-02-23T01:41:08+5:30

समाजात पडणा-या प्रश्नांची उत्तरे व उपाय शोधा. त्यातूनच नवे व्यवसाय सापडतील. तुम्ही जो व्यवसाय निवडाल त्यात झोकून देऊन काम करा.

Find answers to questions; Find the business | प्रश्नांची उत्तरे शोधा; व्यवसाय सापडतील

प्रश्नांची उत्तरे शोधा; व्यवसाय सापडतील

Next

लोणीकंद : समाजात पडणा-या प्रश्नांची उत्तरे व उपाय शोधा. त्यातूनच नवे व्यवसाय सापडतील. तुम्ही जो व्यवसाय निवडाल त्यात झोकून देऊन काम करा. कष्टाची तर तयारी हवी. यशस्वी उद्योजक होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असावे, असे आवाहन उद्योजक डॉ. पराग कुलकर्णी यांनी केले.
वाघोली (ता. हवेली) येथील जेएसपीएम इम्पिरियल कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग व रिसर्च महाविद्यालयातील उद्योजकता विकास विभागा (ईडीसी)च्या वतीने ‘टेक्नो एंटरप्रेन्योर २ के १८’ कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे लोकमत माध्यम प्रायोजक होते.
या वेळी लोकमतचे वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, उद्योजक हरीश मेहता, केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ, आय नॉलेज फॅक्टरीचे प्रमुख आशिष दालिया, एस्पायरच्या वर्षा मराठे, एमसीईडी पुणेचे विभागीय प्रमुख सुरेश उमाप, आयडीईईचे विवेक तिवारी, ट्रिस लॅबचे साहील अरोरा आदींनी विविध सत्रांमध्ये
मार्गदर्शन केले. तसेच, जेएसपीएमचे संचालक डॉ. विवेक कायंदे,
प्राचार्य डॉ. दिलीप शहा, प्रा. संजय जगताप, प्रा. अरुण ढवळे, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रश्न सर्वांना पडतात; पण त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. शिक्षण चालू असताना व्यवसायाचा शोध घ्या; निश्चित यशस्वी व्हाल, असे आवाहन निनाद देसाई यांनी केले. हरीश मेहता म्हणाले, ‘‘देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी युवकांनी बहुमूल्य योगदान देण्याची गरज आहे. उद्योजकच देशाला आर्थिक उंचीवर नेऊ शकतात. आव्हाने कितीही मोठी असली, तरी ज्याच्याकडे गुणवत्ता व नेतृत्वगुण आहे त्याला कोणी रोखू शकत नाही.’’
या वेळी पराग कुलकर्णीलिखित ‘एअर डाऊन स्टोरी आॅफ इंजिनिअर हू फाइट आॅफ एम-थ्री फॉर लव्ह’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ईडीसीचे प्रमुख प्रा. संजय जगताप यांनी प्रास्ताविक केले. संचालक डॉ. विवेक कायंदे व प्राचार्य दिलीप शहा यांनी स्वागत केले. तसेच, पीयूष थाडा, अमृता व्यवहारे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रजनी थिटे यांनी आभार मानले. सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Web Title: Find answers to questions; Find the business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.