जिअाे इन्स्टिट्यूट शाेधा 11 हजार मिळवा, मनविसेची शहरभर पाेस्टरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 04:41 PM2018-07-11T16:41:26+5:302018-07-11T16:43:24+5:30
इन्स्टिट्यूट अाॅफ एमिनन्समध्ये समावेश केलेल्या रिलायन्सचे जिअाे इन्स्टिट्यूट शाेधून देणाऱ्याला मनविसेकडून 11 हजार रुपये देण्यात येणार अाहेत. जर हे इन्स्टिट्यूट सापडले नाही तर प्रकाश जावडेकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा मनविसेने केली अाहे.
पुणे : स्थापना हाेण्याअाधीच केंद्र सरकारच्या इन्स्टिट्यूट अाॅफ एमिनन्स मध्ये निवड झालेल्या जिअाे इन्स्टिट्यूट शाेधून देणाऱ्याला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने 11लाख पैशांचे अर्थात 11 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले अाहे. याची घाेषणा करणारे फ्लेक्स पुणे शहरात ठिककिकाणी लावण्यात अाले अाहे.
जागतिक दर्जाच्या 100 विद्यापीठांमध्ये भारताच्या एकाही विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेचा समावेश नाही. त्यामुळे भारतातील नावजलेल्या सरकारी व खासगी विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांची निवड करुन त्यांना केंद्र सरकारकडून काेट्यावधी रुपयांचा निधी देण्यात येणार अाहे. जेणेकरुन या विद्यापीठांमध्ये जास्तीत जास्त संशाेधन हाेईल, जागतिक दर्जाच्या साेयी उपलब्ध हाेतील. त्यासाठी भारतभरातून विद्यापीठ तसेच शैक्षणिक संस्थांकडून अर्ज मागविण्यात अाले हाेते. या विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांना इन्स्टिट्यूट अाॅफ एमिनन्स चा दर्जा देण्यात येणार हाेता. यात अाता प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या परंतु कागदावर असलेल्या जिअाे या खासगी शैक्षणिक संस्थेचा समावेश करण्यात अाला अाहे. यावर अाता विविध क्षेत्रातून टीका हाेत असून मनविसेने तर चक्क जिअाे विद्यापीठ शाेधणाऱ्याला अकरा हजाराचे बक्षीस जाहीर केले अाहे. तसेच जर हे जिअाे इन्स्टिट्यूट न सापडल्यास मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांनी राजीनामा द्यावा तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा या इन्स्टिट्यूट अाॅफ एमिनन्समध्ये समावेश करावा अशी मागणी करण्यात अाली अाहे. अन्यथा जावडेकरांविराेदात तीव्र अांदाेलन करण्याचा इशारा मनविसेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी दिला अाहे.
यादव म्हणाले, केंद्र सरकारने इन्स्टिट्यूट अाॅफ एमिनन्समध्ये समावेश केलेल्या रिलायन्सच्या जिअाे इन्स्टिट्यूटचा पत्ता पुण्यामध्ये अाहे असे प्रसिद्ध केले अाहे. जिअाे इन्स्टिट्यूट पुण्यात सापडल्यास मनविसेला कळवावे असे अावाहन अाम्ही नागरिकांना केले अाहे. जर हे जिअाे इन्सिट्यूट सापडले नाही तर जावडेकरांनी नैतिकता म्हणून राजिनामा द्यावा. इन्सिट्यूट अाॅफ एमिनन्समध्ये एका जिल्ह्यातील दाेन इन्स्टिट्यूटचा समावेश हाेऊ शकत नाही. त्यामुळे अंबानी हे केंद्र सरकारचे जावई असल्याप्रमाणे त्यांच्या अस्तित्वात नसलेल्या इन्स्टिट्यूटसाठी पायघड्या घातल्या जात अाहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे राज्यातील प्रशम क्रमांकाचे तसेच देशातील नवव्या क्रमांकाचे विद्यापीठ अाहे. त्यामुळे इन्स्टिट्यूट अाॅफ एमिनन्समध्ये पुणे विद्यापीठाचा समावेश करावा अशी अामची मागणी अाहे. अन्यथा प्रकाश जावडेकरांच्या विराेधात मनविसे तीव्र अांदाेलन करेल.