वारी सोहळ्यात प्लॅस्टिकला पर्याय शोधा, मात्र वारकऱ्यांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 01:43 AM2018-07-16T01:43:27+5:302018-07-16T01:43:44+5:30

आषाढवारीमध्ये वारक-यांना मोठ्या प्रमाणावर बसल्याने शासनाने पालखी सोहळ्यासाठी प्लॅस्टिकला पर्याय काढण्याची मागणी जगद्गुरु संत तुकाराममहाराज पालखीचे सोहळाप्रमुख अभिजितमहाराज मोरे यांनी केली आहे.

Find the option of plastic in the wearer, but only Warkaris | वारी सोहळ्यात प्लॅस्टिकला पर्याय शोधा, मात्र वारकऱ्यांचे हाल

वारी सोहळ्यात प्लॅस्टिकला पर्याय शोधा, मात्र वारकऱ्यांचे हाल

googlenewsNext

कोरेगाव भीमा : महाराष्ट्र शासनाने राज्यात प्लॅस्टिकबंदी केल्यानंतर काही दिवसांतच ती यशस्वीही झाली. मात्र या प्लॅस्टिकबंदीचे चटके या वर्षीच्या आषाढवारीमध्ये वारक-यांना मोठ्या प्रमाणावर बसल्याने शासनाने पालखी सोहळ्यासाठी प्लॅस्टिकला पर्याय काढण्याची मागणी जगद्गुरु संत तुकाराममहाराज पालखीचे सोहळाप्रमुख अभिजितमहाराज मोरे यांनी केली आहे.
दररोजच्या जनजीवनात निर्माण होणाºया कचºयामध्ये सत्तर टक्के प्लॅस्टिक असल्याने महाराष्ट्र शासनाने २३ जून रोजी प्लॅस्टिकबंदीचा निर्णय जाहीर केला. या प्लॅस्टिकबंदीचे सर्व थरांतून स्वागतही करण्यात
आले. नागरिकांच्या दररोजच्या जीवनाचा भाग असलेल्या प्लॅस्टिकपासून मुक्ती होण्यास अनेकदा अडचणीही आल्या. मात्र हळूहळू प्लॅस्टिकबंदी यशस्वीही झाली आहे. मात्र, या प्लॅस्टिकबंदीचा फटका मोठ्या प्रमाणावर यावर्षीच्या पालखी सोहळ्यात बसला आहे.
सोहळ्यात पालखीबरोबर चालणाºया वारकºयांना वाटचालीमध्ये लागणारे साहित्य बरोबर असणाºया पिशवीमध्ये
असते. वारकरी आपली कपडे, मोबाईल ठेवण्यासाठी व विसावा घेण्यासाठी प्लॅस्टिकची नितांत गरज असते, मात्र प्लॅस्टिकबंदीमुळे वारकºयांचे हाल झाले आहेत.
त्यामुळे शासनाने प्लॅस्टिकबंदी राबविण्यास विरोध नाही, मात्र पालखी सोहळ्यात वारकºयांना आवश्यक असणारी साधनांचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी प्लॅस्टिकला पर्याय शोधण्याची मागणी जगद्गुरु संत तुकाराममहाराज पालखीचे सोहळाप्रमुख अभिजितमहाराज मोरे यांनी केली आहे.
>वारकºयांची होतेय गैरसोय
संत ज्ञानेश्वरमहाराज व तुकाराममहाराज पालखी सोहळ्यात सोहळाप्रमुखांनी सर्व दिंड्यांना थर्मोकोलच्या पत्रावळी, चहा, पाण्याच्या प्लॅस्टिकच्या ग्लासवर बंदी असल्याने पर्याय शोधण्याच्या सूचना केल्याने सर्वच दिंड्याप्रमुखांनी प्लॅस्टिकबंदी राबवीत स्टीलची ताटे व चहासाठी कागदी ग्लासचा वापर केला असल्याने प्लॅस्टिकबंदीनंतर काही दिवसांतच सुरू झालेल्या पालखी सोहळ्यात शंभर टक्के प्लॅस्टिकबंदी झाली असल्याचे सोहळाप्रमुख अभिजितमहाराज मोरे यांनी सांगितले.

Web Title: Find the option of plastic in the wearer, but only Warkaris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.