‘वोटर हेल्पलाईन अ‍ॅप’ वरही समजणार निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 02:06 PM2019-05-22T14:06:09+5:302019-05-22T14:08:40+5:30

अनेकांच्या मनात मतमोजणी बद्दलची आणि विविध पक्षांच्या उमेदवारांना मिळणा-या मतांबाबतची उत्कंठा वाढत चालली आहे.

Find out the result on 'Voter Helpline app' | ‘वोटर हेल्पलाईन अ‍ॅप’ वरही समजणार निकाल

‘वोटर हेल्पलाईन अ‍ॅप’ वरही समजणार निकाल

Next
ठळक मुद्देपुणे,बारामती,शिरूर व मावळ या चारही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी येत्या २३ मे  ‘वोटर हेल्पलाईन’ हे निवडणूक आयोगाचे अधिकृत मोबाईल अ‍ॅप आहे.मतमोजणी कक्षाच्या बाहेरील परिसरात व आतील बाजूस कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार

पुणे: लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू होण्यास आता काही तास उरलेले आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात मतमोजणी बद्दलची आणि विविध पक्षांच्या उमेदवारांना मिळणा-या मतांबाबतची उत्कंठा वाढत चालली आहे. मात्र, मतमोजणी कक्षात उपस्थित न राहता सुध्दा उमेदवारांना प्रत्येक फेरीत मिळणा-या मतांची माहिती ‘वोटर हेल्पलाईन’ या मोबाईल अ‍ॅपवर समजू शकणार आहे. त्यामुळे केवळ विविध वृत्त वाहिन्यांवर दाखविल्या जाणा-या मतमोजणीच्या आकडेवारीवरच अवलंबून राहावे लागणार नाही.
पुणे जिल्ह्यातील पुणे,बारामती,शिरूर व मावळ या चारही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी येत्या २३ मे रोजी होणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी आवश्यक असलेली सर्व  तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणी कक्षाच्या बाहेरील परिसरात व आतील बाजूस कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे.त्यातही प्रशासनाकडून पास देण्यात आलेल्या व्यक्तींनाच मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार आहे.परिणामी कोणत्या उमेदवाराला कोणत्या फेरीत किती मते मिळाली याबाबतची माहिती मतदान कक्षातील व्यक्तींना तात्काळ समजणार असली तरी त्याचवेळी निवडणूक आयोगाला सहायक निवडणूक अधिका-यांकडून मतमोजणीची आकडेवारी ऑनलाईन पध्दतीने कळविली जाणार आहे.त्यामुळे निवडणूक अधिका-याने ऑनलाईन भरलेली माहिती ‘वोटर हेल्पलाईन’ या मोबाईल अ‍ॅपवरही दिसणार आहे.
 ‘वोटर हेल्पलाईन’ हे निवडणूक आयोगाचे अधिकृत मोबाईल अ‍ॅप आहे. त्यामुळे निकालाची अधिकृत आकडेवारी प्रत्येकाला आपल्या मोबाईलवर पहाता येणार आहे.सर्व सामान्य नागरिकांना सुध्दा आपल्या मोबाईलवर मतमोजणीची आकडेवारी समजू शकेल ,असे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह यांनी सांगितले.
-------------------------------------------------
 लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीच्या फे-यांची आकडेवारी केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे ‘वोटर हेल्पलाईन’ या मोबाईल अ‍ॅपवर प्रसिध्द केली जाणार आहे. त्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये ‘वोटर हेल्पलाईन’ हे मोबाईल अ‍ॅप डाऊन लोड करून घेणा-यांना मतमोजणीच्या फे-यांमध्ये मोजल्या जाणा-या मतांची आकडेवारी समजू शकेल.
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी ,पुणे 

Web Title: Find out the result on 'Voter Helpline app'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.