भाकरीचा चंद्र शोधणाऱ्यांची परवड

By admin | Published: May 23, 2017 05:08 AM2017-05-23T05:08:12+5:302017-05-23T05:08:12+5:30

राठ झालेले केस, पायांत असल्याच तर रबराच्या बंधतुटक्या चपला, काळपटलेलं अंग, त्यावर ठिगळं लावलेली मळकट चिंधीसदृश्य कपडे, पाठीवर पोतंभर ओझं

Finding the bread for the moon seekers | भाकरीचा चंद्र शोधणाऱ्यांची परवड

भाकरीचा चंद्र शोधणाऱ्यांची परवड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भोसरी : राठ झालेले केस, पायांत असल्याच तर रबराच्या बंधतुटक्या चपला, काळपटलेलं अंग, त्यावर ठिगळं लावलेली मळकट चिंधीसदृश्य कपडे, पाठीवर पोतंभर ओझं आणि हातात कचरा निवडायची आकडी. बकाल वस्तीतलं राहणं. कचराकुंडीतील कागद, काच, पत्रा, प्लॅस्टिक वेगळं करून विकून चार पैसे मिळवणे, पत्रावळ्यांतलं खरकटं गोळा करणं, कधी काहीच नाही मिळालं तर भीक मागून दिवस ढकलणं, असं आयुष्य आहे, भोसरी परिसरातील शेकडो कचरावेचकांचे.
ओल्या, सुक्या कचऱ्याने भरलेला टेम्पो, ट्रकची वाट पाहत या कचऱ्यातून आपल्या घराची चूल पेटवणाऱ्या भोसरी मोशीतील कचरावेचकांची स्थिती दयनीय आहे. कचरावेचक कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा उपकरणे पुरवण्यात आलेली नाहीत. तसेच जीवघेण्या घाणीत, दुर्गंधीत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना पुरेशा आरोग्य सुविधा पुरवल्या जात नाहीत. त्यामुळे कचरावेचक कर्मचाऱ्यांची परवड कायम असून महापालिका प्रशासनाने त्यांच्या आर्थिक स्थैर्याचा व आरोग्याचा विचार करण्याची मागणी होत आहे़
भोसरी-आळंदी रस्त्यावरील मॅगझीन चौकाजवळ तसेच मोशी कचरा डेपो परिसरात काम करणाऱ्या कचरावेचकांचा दिवस सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होतो. सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या कचऱ्यातून आपली भाकरी शोधणारे कचरावेचक कायमच दुर्लक्षित राहिले आहेत. भोसरी, लांडेवाडी, शांतीनगर, फुलेनगर, बालाजीनगर, खंडेवस्ती या भागातील झोपडपट्टी परिसरातील बहुसंख्य महिला व पुरुष कचरावेचण्याचे काम करत आहेत. कचरा वेचून त्यातील प्लॅस्टिक, काच, लोखंड, भंगार साहित्य इतर पुन्हा वापरण्यासारख्या वस्तू बाजूला केल्या जातात. त्यांची विक्री केली जाते. त्यातून कचरावेचकांना दिवसाला १०० ते २०० रुपये मिळतात. मात्र, कचरा वेचण्याच्या ठिकाणी असलेली दुर्गंधी, घाणीमुळे कचरावेचकांचे आरोग्य धोक्यात असते. त्यांना आजारांनी कायम ग्रासलेले असते. परिणामी आयुर्मान कमी होते.

मुलांना शिकवण्याचा प्रयत्न
दिवसभर कचऱ्यातून आवश्यक वस्तू बाजूला काढून त्याच्या विक्रातून कचरावेचकांचा उदरनिर्वाह चालतो. अशाही स्थितीत आपल्या मुलांना शाळेत घालून त्यांना शिक्षण देण्यासाठी हे कर्मचारी
प्रयत्नशील आहेत. १५ रुपये प्रतिकिलो प्लॅस्टिक,
८ रुपये प्रतिकिलो भंगार लोखंड, दोन रुपये किलो प्लॅस्टिक पिशव्या, एक रुपये किलो काच या
भावाने कचऱ्यातून सामग्री काढली जाते.
यामागे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह
आणि मुलांचे शिक्षण हा एकच
हेतू असतो.

Web Title: Finding the bread for the moon seekers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.