पुण्यात भवानी पेठेतील हॉटेलवर तब्बल १ लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 05:15 PM2021-05-23T17:15:40+5:302021-05-23T17:26:31+5:30

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाची कारवाई

A fine of Rs 1 lakh was imposed on a hotel in Bhavani Peth in Pune | पुण्यात भवानी पेठेतील हॉटेलवर तब्बल १ लाखांचा दंड

पुण्यात भवानी पेठेतील हॉटेलवर तब्बल १ लाखांचा दंड

Next
ठळक मुद्देसर्व नागरिकांनी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे महापालिकेचे आवाहन

पुणे: भवानी पेठेतील मिलन व्हेज हॉटेल वर पुणे महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एक लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हॉटेल मध्ये ग्राहकांना टेबल वर बसून जेवण करू दिल्याने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मुख्तार सय्यद यांच्या पथकाने धाड टाकत कारवाई केली.

आठ दिवसआगोदारच बनकर हे हडपसर क्षेत्रीय कार्यालयातून बदली होत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात रुजू झाले आहेत. त्यांनी हडपसर क्षेत्रीय कार्यालयात असताना मार्च ते मे महिन्यात अशीच दंडात्मक कारवाई करत जवळपास २८ लाख रुपयांचा दंड महापालिकेच्या तिजोरीत जमा केला होता. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा दोन दिवस अगोदार सहाय्यक आयुक्तांचा कार्यभार स्वीकारला होता. काल त्यांनी मिलन हॉटेलवर कारवाई करत १ लाख रुपयांचा दंड धनादेशद्वारे वसूल देखील केला. यावेळी आरोग्य निरीक्षक संतोष कदम संजय साळुंके निसार मुजावर मोहन चांडले आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

"खरं तर आम्ही फक्त पार्सल सेवा सुरू ठेवली आहे. परंतु काल बाहेरच्या शहरातील काही नागरिक जेवणासाठी आले होते. त्यांनी खूप विनंती केली. त्यामुळे आम्ही माणुसकी म्हणून बसून जेवायला दिल असल्याचे हॉटेल मालक मोहम्मद रईस अब्दुल्ला यांनी सांगितले आहे".

"दोनच दिवस अगोदार कार्यभार स्वीकारला असून ही पहिलीच कारवाई आहे. सर्वांच्या दृष्टीने आरोग्य महत्वाचे आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी पालिकेने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन सोमनाथ बनकर यांनी केले आहे". 
 

Web Title: A fine of Rs 1 lakh was imposed on a hotel in Bhavani Peth in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.