नियमांचे उल्लंघन करून लग्नसमारंभ करणाऱ्यांना ५० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:10 AM2021-04-28T04:10:30+5:302021-04-28T04:10:30+5:30
भोर शहरातील सह्याद्री मंगल कार्यालयात काल दुपारी भेलके व शेटे यांचा शुभविवाह झाला. मात्र सदर लग्न समारंभासाठी शासनाने घालून ...
भोर शहरातील सह्याद्री मंगल कार्यालयात काल दुपारी भेलके व शेटे यांचा शुभविवाह झाला. मात्र सदर लग्न समारंभासाठी शासनाने घालून दिलेल्या निर्धारित संख्येपेक्षा अधिक लोक एकत्र आले. या वेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे भोर पोलिसांनी भेलके व शेटे यांच्यावर ५० हजार रुपये दंडाची कारवाई केली. सदरची कारवाई भोरचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे व उपनिरीक्षक बळीराम सांगळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत केली.
दरम्यान, भोर पोलिसांनी चार दिवसांमध्ये मास्क न घातलेल्या व मोकाट फिरणाऱ्या ७१ जणांवर कारवाई करून ३४ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. तसेच ४६ वाहनचालकांकडून २५ हजार ३०० रु रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर पोलिसांनी पिसावरे, नाझरे, आपटी, टिटेघर, वडतुंबी, कर्नावाड, भावेखल, आंबेघर, नाटंबी खानापूर, कारी, आंबेघर, भोलावडे, उत्राैली या गावांमध्ये जाऊन करण्याबाबत जनजागृती देखील केली.