भोरमध्ये मोकार फिरणाऱ्या १२८ जणांकडून ६० हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:12 AM2021-04-23T04:12:21+5:302021-04-23T04:12:21+5:30
भोर पोलीस स्टेशनच्या वतीने भोर शहरात व ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणारे तसेच ...
भोर पोलीस स्टेशनच्या वतीने भोर शहरात व ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणारे तसेच मास्क न वापरणारे, विनामस्क गर्दीत वाहन चालविणारे, सोशल डिस्टन्सिंगचा पालन न करणारे, कलम १४४ चे उल्लंघन करणारे इत्यादी व्यक्तींवर विविध पथकाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात आली. ही मोहीम मागील चार दिवसांपासून करण्यात येत आहे.
विनामास्क १०३ केसेस करण्यात आल्या असून ५२ हजार दंड वसूल करण्यात आला. कोरोना कालावधीत नियमाचे उल्लंघन करून बेकायदेशीर वाहन चालविणारे २५ वाहनचालकांवर कार्यवाही करून ८ हजार ३०० दंड वसूल करण्यात आला. असे एकूण १२८ केसेस वर दंडात्मक ६० हजार ३०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन न केल्याने दोन दुकाने सीलबंद करून तसा प्रस्ताव भोरचे तहसीलदार अजित पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.
ग्रामीण भागात अवैध दारू विक्री करणारे पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
भोरचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र पवार, बी. एस. सांगळे, पोलिस नाईक अमोल मुऱ्हे, शिवाजी काटे, राहुल मखरे, दत्तात्रय खेंगर, प्रमिला निकम, दामिनी दाभाडे, होमगार्ड शाम पवार, सुजित रणखांबे, भाग्यश्री लांडे इत्यादी उपस्थित होते.
--
कोट -१
कोरोणचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने शासन नियमाचे पालन करावे नागरिकांनी विनाकारण फिरू नये, तसेच मास्कचा वापर करा,सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
प्रवीण मोरे, पोलिस निरीक्षक
--
फोटो क्रमांक : २२महुडे दंड कारवाई
फोटो - ग्रामीण भागात जनजागृती करताना पोलिस कर्मचारी