मास्क शिवाय फिरणाऱ्याला एक हजाराचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:08 AM2021-06-29T04:08:00+5:302021-06-29T04:08:00+5:30
कडूस ग्रामपंचायत क्षेत्रात सध्या २० पेक्षा जास्त पाॅझिटिव्ह कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे कडूस व परिसरातील वाड्या-वस्त्यांमध्ये चिंताजनक ...
कडूस ग्रामपंचायत क्षेत्रात सध्या २० पेक्षा जास्त पाॅझिटिव्ह कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे कडूस व परिसरातील वाड्या-वस्त्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती दिसून येत आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना ग्रामस्तरीय प्रतिबंधक समितीने दि.२६ जून पासून पुढील आदेश होईपर्यंत सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत अत्यावश्यक (दूध संकलन केंद्र, मेडिकल दुकान, दवाखाना) वगळून सर्व आस्थापना बंद ठेवण्यासाठीचे आदेश दिले आहेत. सूचित कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्था, तसेच संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सरपंच निवृत्ती नेहेरे आणि आणि उपसरपंच कैलास मुसळे यांनी सांगितले आहे. कडूस व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रतापराव ढमाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दुकानांच्या वेळेत सवलत मिळावी यासाठी निवेदन दिले होते. त्यानुसार सकाळ ७ ते ११ ऐवजी सकाळी ७ ते दुपारी २ ही मागणी मान्य करून व्यापाऱ्यांना ॲंटिजन तपासणी करून घेण्याची आणि लसीकरणाची सक्ती केली आहे.शासकीय तपासणी पथकाला पाहणीत कमतरता दिसून आल्यास हे संबंधित व्यक्ती तसेच संस्थेवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे सुचना पत्रकात म्हटले आहे. कडूस स्टॅण्ड व परिसरात लोकांची वर्दळ होते. हे ठिकाण मोकळे केल्यास स्थानिक व बाहेर गावच्या लोकांचा संपर्क येणार नाही. गावात २-३ ठिकाणी आठवडे बाजार व दैनिक छोट्या बाजाराची तात्पुरती व्यवस्था व्हावी. प्रतिबंधक समितीने शीतलतेऐवजी कडक निर्बंधांची अंमलबजावणी करावी. अन्यथा, पुढे परिस्थिती हाताबाहेर जाईल.
अशोक शेंडे, जि. प. सदस्य, चांगदेव ढमाले, माजी ग्रा. पं. सदस्य.
कडूस(ता.खेड)येथे कोरोना साखळी तोडण्यासाठी निर्बंध लागू केल्याने बाजार पेठेत शुकशुकाट जाणवला.