प्रियांका चोप्राच्या भावाविरोधात पुण्यात गुन्हा दाखल
By admin | Published: July 15, 2016 06:56 AM2016-07-15T06:56:17+5:302016-07-15T06:56:17+5:30
कोरेगाव पार्क परिसरातील रेस्टॉरंटमधील स्मोकिंग झोनच्या बाहेर हुक्का उपलब्ध करुन दिला जात आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे.
ऑनलाइन लोकमत
पुणे , दि. १५ : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा याच्याविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुण्यामधील कोरेगाव पार्क परिसरात सिद्धार्थ चोप्रा याचे रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटच्या बाहेर हुक्का उपलब्ध करुन देत असल्याचा सिद्धार्थवर आरोप आहे.
कोरेगाव पार्क परिसरातील रेस्टॉरंटमधील स्मोकिंग झोनच्या बाहेर हुक्का उपलब्ध करुन दिला जात आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा २००३ कलम ४ व २१ प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरुन पोलिसांनी काही हुक्का मशीन जप्त केल्या आहेत. तसेच काही ग्राहकांना नोटिस बजावल्या आहेत.
सिद्धार्थ चोप्राच्या या हॉटेलवर कारवाई करण्याची ही दुसरी वेळ आहे. कारण, यापूर्वीसुद्धा या पार्लरवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती