पार्थ पवार यांचे फोटो व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 05:02 PM2019-04-27T17:02:45+5:302019-04-27T17:06:05+5:30
मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांचे मैत्रिणीसोबतचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद चिंचवड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांचे मैत्रिणीसोबतचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद चिंचवड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
या प्रकरणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्ह्याध्यक्षा वैशाली नागवडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पीसीएमसी शिवसेना फेसबुक पेजवरील इसम, निखील देवकाते-पाटील यासह श्रीमंत व इतर व्हाट्सअप्प ग्रुप वर फोटो व्हायरल करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अशा पोस्ट, फोटो व्हायरल करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबतचे निवेदन पोलिसांना दिले. त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस फोटो, व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांची माहिती गोळा करत आहेत.