पत्रकाराविरोधात सोशल मीडियावर शिवीगाळ, राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 12:23 AM2019-02-09T00:23:37+5:302019-02-09T00:24:00+5:30

पत्रकाराविरोधात सोशल मीडियाद्वारे आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ करून पत्रकाराच्या प्रतिष्ठेला बाधा येईल, असे कृत्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य मराठी संघाच्यावतीने निषेध करून राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांविरोधात लोणी काळभोर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FIR register Against three NCP Workers | पत्रकाराविरोधात सोशल मीडियावर शिवीगाळ, राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पत्रकाराविरोधात सोशल मीडियावर शिवीगाळ, राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Next

कदमवाकवस्ती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याविरोधात बातमी केल्याच्या कारणावरून काही कार्यकर्त्यांकडून पत्रकाराविरोधात सोशल मीडियाद्वारे आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ करून पत्रकाराच्या प्रतिष्ठेला बाधा येईल, असे कृत्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य मराठी संघाच्यावतीने निषेध करून राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांविरोधात लोणी काळभोर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पत्रकाराच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचविण्याचे काम करून पत्रकाराला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याने महाराष्ट्र राज्य मराठी संघाच्या वतीने निषेध करून राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे चेतन गावडे व मिलिंद गोरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून निषेध करण्यात आला.

लोणी काळभोर येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने परिवर्तन निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासंदर्भात स्थानिक पत्रकार सीताराम लांडगे यांनी बुधवारी ‘राष्ट्रवादीची लोणी काळभोरची सभा फेल’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून या बातमीच्या माध्यमातून राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलच्या दोन कार्यकर्त्यांनी फेसबुक या सोशल मीडियामध्ये आक्षेपार्ह भाषा वापरून अश्लील भाषेत शिवीगाळ करून पत्रकाराविरोधात बदनामीकारक पोस्ट शेअर केल्या होत्या. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षप्रवक्ता म्हणून काम पाहणाऱ्याने सुपारी घेऊन बातमी केल्याचा आरोप केला होता.

Web Title: FIR register Against three NCP Workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.