अारटीअाेत पुन्हा अाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 01:39 PM2018-06-19T13:39:13+5:302018-06-19T14:27:42+5:30
गेल्या अाठवड्यात अारटीअाेच्या खाेलीला लागलेल्या अागीची घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच खाेलीला मंगळवारी सकाळी अाग लागली. या अागीत महत्त्वाची कागदपत्रे जळाली.
पुणे : अाठवडाभरापूर्वीच पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयच्या ( अारटीअाे) एका खाेलीला लागलेली अागीची घटना ताजी असतानाच मंगळवारी पुन्हा एकदा त्याच खाेलीला अाग लागली. अागीची तीव्रता माेठी नसली तरी पाण्याच्या माऱ्यामुळे माेठ्याप्रमाणावर कागदपत्रे भिजली अाहेत.
गेल्याच अाठवड्यामध्ये अारटीअाे कार्यालयातील वाहन नाेंदणी कागदपत्रे ठेवलेल्या खाेलीला अाग लागली हाेती. शाॅक सर्किटमुळे ही अाग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात अाला हाेता. मंगळवारी सकाळी पुन्हा त्याच खाेलीला अाग लागून त्या अागीत काही कागदपत्रे जळून खाक झाली. अाग विझविण्यासाठी माेठ्याप्रमाणावर पाण्याचा मारा करावा लागल्याने खाेलीतील सर्वच कागदपत्रे पाण्याने भिजून गेली. अग्निशामक दलाच्या मुख्य कार्यालयाचे स्टेशन अाॅफिसर प्रकाश गाेरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळावरी सकाळी 9 च्या सुमारास अारटीअाेतील एका खाेलीला अाग लागल्याचा फाेन अाला. त्यानंतर लगेचच अग्निशामक दलाच्या दाेन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तातडीने अागीवर पाण्याचा मारा करत 15 मिनिटांमध्ये अाग अाटाेक्यात अाणण्यात अाली. कागदपत्रे जळाल्याने माेठ्याप्रमाणावर धूर सर्वत्र पसरला हाेता. अाग पुन्हा लागू नये यासाठी कुलिंग अाॅपरेशन करण्यात अाले. अग्निशामक दलाच्या 10 जवानांनी ही अाग विझवली.
शाॅक सर्किटमुळे अाग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत अाहे. अारटीअाे कार्यालयातील वायरिंग जुनी झाली असल्यामुळे शाॅक सर्किटच्या घटना घडत अाहेत. त्यामुळे वायरिंग बदलण्याच्या तसेच लाेखंडी मांडण्या वापरून त्या भिंतीपासून लांब अंतरावर ठेवण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या असल्याचेही गाेरे यांनी सांगितले.
दरम्यान अाग लागल्यानंतर कार्यालयीन कर्मचाऱ्याकडून अाग विझविण्याचा प्रयत्न करण्यात अाला. त्यानंतर अग्निशामक दलाकडून अागीवर नियंत्रण मिळवत अाग विझविण्यात अाली. पाेलीसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात अाला अाहे. अाम्ही अामच्या इमारतीचे तातडीने फायर अाॅडिट करणार अाहाेत. वाहन नाेंदणीची कागदपत्रे पाण्यामुळे भिजली असली तरी माहिती संगणकावर साठविण्यात अाल्याने माहितीचे कुठलेही नुकसना झाले नाही, असा खुलासा अारटीअाेकडून देण्यात अाला अाहे.