आकुर्डीत शाळेला लागून असलेल्या अगरबत्तीच्या कंपनीला आग; 400 विद्यार्थ्यांना बाहेर काढले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 11:23 AM2022-12-06T11:23:23+5:302022-12-06T11:27:39+5:30

आगीची ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली...

Fire at Agarbatti Company adjacent to Akurdi School; 400 students were expelled | आकुर्डीत शाळेला लागून असलेल्या अगरबत्तीच्या कंपनीला आग; 400 विद्यार्थ्यांना बाहेर काढले

आकुर्डीत शाळेला लागून असलेल्या अगरबत्तीच्या कंपनीला आग; 400 विद्यार्थ्यांना बाहेर काढले

Next

- नारायण बडगुजर

पिंपरी : पांढरकर नगर आकुर्डी येथील लोहमार्गाच्या अगरबत्तीच्या कारखान्याला आग लागली. एका शाळेला लागून असलेल्या या कारखान्यातील आगिने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. त्यामुळे शाळेतील सुमारे 400 विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. आगीची ही घटना मंगळवारी (दि. ६) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

प्राथमिक माहितीनुसार, आकुर्डी येथील अगरबत्तीच्या कंपनीत अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारील पत्रा शेड ची काही घरांना त्याच्या झळा बसून मोठे नुकसान झाले. शाळेजवळ आग लागल्याची माहिती मिळतात विद्यार्थ्यांच्या पालकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. काही नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न सुरू आहेत. 

आगीचे लोट आणि धूर मोठ्या प्रमाणात असल्याने स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाली. मात्र अग्निशामक दल पोलीस आणि महापालिका अधिकारी यांच्याकडून दिलासा दिला जात आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.

Web Title: Fire at Agarbatti Company adjacent to Akurdi School; 400 students were expelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.