Pune: विमाननगरमधील फिनिक्स मॉलला आग; अग्निशमनचे सहा बंब घटनास्थळी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 17:18 IST2024-04-19T17:16:20+5:302024-04-19T17:18:00+5:30
नगररस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम सुरू असून मॉलमधील सर्व कामगार रस्त्यावर आले....

Pune: विमाननगरमधील फिनिक्स मॉलला आग; अग्निशमनचे सहा बंब घटनास्थळी दाखल
चंदननगर (पुणे) : नगर रस्त्यावर विमाननगर चौकातील पुणे शहरातील सर्वात मोठ्या मॉलला भीषण आग लागल्याची घटना आज दुपारी घडली. नगर रस्त्यावर विमाननगर चौकातच फिनिक्स मॉललच्या बंद हॉटेलला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती असून साधरणतः तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आग विझवण्याचे काम अग्निशमन दल करत आहे.
घटनास्थळी रुग्णवाहिका, वाहतूक पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. नगररस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम सुरू असून मॉलमधील सर्व कामगार रस्त्यावर आले. मॉलच्या मागच्या बाजूला बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. आग कशी लागली याचे कारण अद्याप समजले नाही. आग एका तासाभरात आटोक्यात आल्याची माहिती मिळाली.