Video: दापोडीत रेल्वे स्टेशनच्या रिले रूमला आग, पुणे-लोणावळा लोकल फेऱ्या स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 10:35 PM2022-03-04T22:35:16+5:302022-03-04T22:36:14+5:30
रेल्वे वाहतूक खोळंबली: अधिकाऱ्यांकडून तातडीने पाहणी
पिंपळे गुरव/पिंपरी : दापोडी येथील रेल्वे स्टेशनच्या रिले रूमला आग लागली. त्यामुळे दापोडी पासून पिंपरी चिंचवड पर्यंतचे सिग्नल बंद झाले. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊन रेल्वेचे नियोजन विस्कळीत झाली. ही आग सातच्या सुमारास लागली. या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र, रिले रुमचे सर्व सामान जळून खाक झाले. आग लागल्याचे कारण समजले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पिंपरीतील अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचून त्यांनी आग आटोक्यात आणली. रस्ता अरुंद असल्याने गाड्यांना आता जात आले नाही. मुख्य रस्त्यावरूनच अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा केला. रिले रूमला आग लागल्याने दापोडी येथील गेट बंद पडला होता. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी वाहतुकीचा वापर करावा लागला. तर कामावरून घरी जाणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
पिंपरी - दापोडीतील रेल्वे स्टेशनच्या रिले रूमला आग, पुणे-लोणावळा लोकल स्थगित pic.twitter.com/8sP3txWUsE
— Lokmat (@lokmat) March 4, 2022
पुणे-लोणावळा लोकल फेऱ्या स्थगित
आग लागल्याने काही काळ दापोडी ते चिंचवड पर्यंतचे सिग्नल बंद होते. त्यामुळे रेल्वेची वाहतूक काही काळ खोळंबळी होती. जवळपास दोन तासांनी रेल्वे वाहतूक संथ गतीने सुरू करण्यात आली. तर लोणावळा-पुणे लोकलच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे दापोडीचे स्टेशन प्रबंधक परेश मेंडजोगे यांनी सांगितले.
विभागीय अधिकाऱ्यांकडून तातडीने पाहणी
आगीच्या ठिकाणी पुणे विभागीय मुख्य व्यवस्थापक रेणू शर्मा, विभागीय मुख्य उप अधिकारी शाम कुलकर्णी पाहणी करून कामाचा आढावा घेतला.