फायर आॅडिटचा फार्स, बस आगप्रकरण : ‘पीएमपी’ला सापडेना नेमके कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 03:02 AM2019-02-03T03:02:55+5:302019-02-03T03:03:21+5:30

बसला सातत्याने आगी लागत असल्या तरी अद्याप पुणे महानगर परिवहन महामंडळाला नेमके कारण शोधता आलेले नाही. देखभाल-दुरूस्तीच्या अभावामुळे बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 Fire audit fars, bus fire: The reasons for finding the PMP | फायर आॅडिटचा फार्स, बस आगप्रकरण : ‘पीएमपी’ला सापडेना नेमके कारण

फायर आॅडिटचा फार्स, बस आगप्रकरण : ‘पीएमपी’ला सापडेना नेमके कारण

Next

पुणे  - बसला सातत्याने आगी लागत असल्या तरी अद्याप पुणे महानगर परिवहन महामंडळाला नेमके कारण शोधता आलेले नाही. देखभाल-दुरूस्तीच्या अभावामुळे बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मागील अनेक महिन्यांपासून केवळ ‘बस फायर आॅडिट’ खेळ खेळला जात आहे.
पीएमपी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, महामंडळाकडे ८१९ डिझेल व ५६३ सीएनजी अशा एकूण १३८२ स्वमालकीच्या बस आहेत. तर भाडेतत्वावरील ६५३ बस सीएनजीवरील आहेत. वर्ष २०१७-१८ मध्ये आतापर्यंत १३ बसला आग लागली आहे. त्यामुळे पीएमपीच्या मालकीच्या बससह भाडेतत्वावरील बसही आहेत. दर महिन्याला एक याप्रमाणे बस जळून खाक होत
आहेत. या घटना रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातात. पण हे उपाय तात्कालीक ठरत आहेत. सर्व बसमध्ये अग्निशमन यंत्र बसविण्याची घोषणा करण्यात आली होती. पण अद्याप शेकडो बसमध्ये ही यंत्र नाहीत. आग लागल्यानंतर अद्याप एकाही चालक किंवा वाहनाने या यंत्राचा वापर केलेला नाही. काही महिन्यांपूर्वी बसचे फायर आॅडिट करण्याची घोषणाही आगीच्या धुरात विरून गेली. केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेवर (सीआयआरटी) ही जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. एका खासगी संस्थेकडून हे आॅडिट करून घेण्याचेही नियोजन होते. पण अशी कोणतीही संस्था
नसल्याचे समोर आले. एका
संस्थेला दिलेले कामही अधिक खर्चामुळे मागे घेण्यात आले. त्यानंतर आॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन आॅफ इंडिया (एआरएआय) या संस्थेकडून आॅडिट केले जाणार होते. पण तेही मागे पडले.
आता प्रशासनाने स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. ही समिती तरी आगडोंब विझविणार का? हे येत्या काही दिवसांत समजेल. पण आतापर्यंत लागलेल्या आगींचे नेमके कारण समजले नसले तरी या आगी देखभाल-दुरूस्तीच्या अभावामुळेच लागत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बसला आग लागण्यापुर्वी पुढील बाजूने धूर येतो. त्यानंतर लगेचच आग लागून संपूर्ण बस पेटते. चालकांच्या प्रसंगावधानामुळे या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण त्यामुळे या घटनांचे महत्व कमी होत नाही. बसची योग्य प्रकारे देखभाल नसल्यास केवळ आगच नाही तर कशाही प्रकारे अपघात होण्याची शक्यता
आहे. जुन्या बसचे पीएमपीचे
कारणही चुकीचे ठरत आहे.
चार-पाच वर्षांपूर्वीच्या बसही
पेटल्या आहेत.

दरमहा तांत्रिक परिक्षण : उपाययोजनांचा आढावा

बस फायर आॅडिटसाठी पीएमपी प्रशासनाने काही दिवसांपूर्वी स्वतंत्र समिती नेमली आहे. या समितीमध्ये एआरएआय, सीआयआरटी, आरटीओचे प्रत्येकी एक अधिकारी, टाटा मोटर्स, अशोक लेलँड, महालक्ष्मी आॅटोमोटिव्ह, अँथनी गॅरेजचा प्रत्येकी एक प्रतिनिधी, फायर आॅडिट कन्स्लटंट, पीएमपीचे दोन मुख्य अभियंता, भांडार अधिकारी व देखभाल अभियंता यांचा समावेश आहे.
महामंडळाकडील डिझेल व सीएनजी बसचे दरमहा तांत्रिक परीक्षण करण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समितीची बैठक होईल. त्यामध्ये बस फायर आॅडिट करून अहवाल सादर केला जाईल.
समितीची २२ जानेवारी रोजी बैठक झाली असून त्यामध्ये उपाययोजनांचा आढावा तयार करण्यात आला असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

भाडेतत्वावरील बसकडे दुर्लक्ष

पीएमपी प्रशासनाने नुकतीच स्थापन केलेली समिती केवळ स्वमालकीच्या बसचेच आॅडिट करणार आहे. पण भाडेतत्वावरील बसबाबत मात्र निर्णय घेण्यात आलेला नाही.

बुधवारी आग लागलेली बस भाडेतत्वावरील होती. या बसेसच्या देखभाल-दुरूस्तीवर पीएमपीचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे ब्रेकडाऊनचे प्रमाणही अधिक आहे. तरीही प्रशासन या बसकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

ठेकेदारांना सातत्याने पत्रव्यवहार करून सक्त ताकीद दिल्याचा दावा अधिकारी करतात. पण त्यानंतरही स्थिती सुधारताना दिसत नाही.

Web Title:  Fire audit fars, bus fire: The reasons for finding the PMP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.