Pune: कोंढवा आणि बाणेरमध्ये मध्यरात्री आग, कामगाराची सुटका करण्यात यश
By विवेक भुसे | Published: December 12, 2023 03:44 PM2023-12-12T15:44:23+5:302023-12-12T15:45:11+5:30
अग्निशामक दलाने काही वेळात आग विझविली. गोदामामधील सर्व पॅकिंगचे साहित्य जळून खाक झाले....
पुणे : शहरात कोंढवा आणि बाणेर येथे मध्यरात्रीच्या सुमारास आगीच्या घटना घडली. बाणेर येथे आगीमुळे अडकलेल्या एका कामगाराची सुटका अग्निशामक दलाने केली. कोंढवा बुद्रुक येथील सर्व्हे क्रमांक १४ येथे एक्सिलंट पॅकिंग हे गोदाम आहे. मध्यरात्रीच्या सुमारास या गोदामाला मोठी आग लागली. बंद गोदामामधून धुर येत असल्याचे पाहून नागरिकांनी अग्निशामक दलाला कळविले. अग्निशामक दलाने काही वेळात आग विझविली. गोदामामधील सर्व पॅकिंगचे साहित्य जळून खाक झाले.
दुसरी आगीची घटना बाणेर येथील मोदी स्केअर इमारतीतील दुसर्या मजल्यावर लागली. या इमारतीतील मराठा सम्राटवर दुसर्या मजल्यावर क्लाऊड ऑनलाईनमधील भटारखान्याला आग लागली होती. अग्निशामक दलाने ही आग अर्धा तासात विझवली. याच इमारतीच्या तिसर्या मजल्यावर डान्स अॅकेडमी आहे. तेथे एक कामगार अडकला होता. अग्निशामक दलाने त्याची सुखरुप सुटका केली. आगीत भटारखान्यातील सर्व साहित्य जळून खाक झाले.