अतिक्रमण कारवाईत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 03:35 PM2018-03-15T15:35:13+5:302018-03-15T15:35:13+5:30

कात्रज कोंढवा रोडवरील गोकुळनगर येथे महापालिकेच्या जागेवर सुमारे १००हून अधिक झोपड्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस फाट्यासह गुरुवारी तेथे गेले होते़. त्यावेळी ही घटना घडली़.

Fire brigade staff attacked in encroachment action | अतिक्रमण कारवाईत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला

अतिक्रमण कारवाईत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देतीन जवान जखमी : कोंढव्यातील गोकुळनगरमधील घटनापोलिसांनी घेतले दगडफेक करणाऱ्यांना घेतले ताब्यात 

पुणे : कात्रज कोंढवा रोडवरील गोकुळनगर येथे अतिक्रमण कारवाई सुरु असताना झोपडपट्टीधारकांनी विरोध करुन झोपडी पेटविली़.ती विझविण्यासाठी गेलेल्या अग्निशामक दलाच्या गाड्यावर दगडफेक करुन जवानांना मारहाण करण्यात आली़.त्यात तीन जवान जखमी झाले असून अग्निशामक दलाची गाडी, जेसीबीची मोडतोड करण्यात आली आहे़. ही घटना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली़.  
याबाबत मिळालेली माहिती अशी, कात्रज कोंढवा रोडवरील गोकुळनगर येथे महापालिकेच्या जागेवर सुमारे १००हून अधिक झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे़. हे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस फाट्यासह गुरुवारी तेथे गेले होते़. यावेळी तेथील झोपड्यांमधील महिलांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली़. त्यात एक महिला पोलीसही जखमी झाल्या आहेत़ तसेच जेसीबीची मोडतोड करण्यात आली़. त्यावेळी तेथील एक झोपडी पेटवून देण्यात आली़. ती विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने तेथे गेले़. त्यावेळी लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली़.तसेच कर्मचाऱ्यांना मारहाण केली़. त्यात तीन कर्मचारी जखमी झाले आहेत़ कात्रज कोंढवा रोडवरील आहे़. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे़.

Web Title: Fire brigade staff attacked in encroachment action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.