विहिरीत उडी मारलेल्या महिलेला अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 07:45 PM2019-01-06T19:45:58+5:302019-01-06T21:48:37+5:30
विहीरीत उडी मारलेल्या 50 वर्षीय महिलेला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. महंमदवाडी येथील कृष्णानगरमधील गल्ली नंबर 16 मध्ये ही घटना घडली.
पुणे : विहीरीत उडी मारलेल्या 50 वर्षीय महिलेला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. महंमदवाडी येथील कृष्णानगरमधील गल्ली नंबर 16 मध्ये ही घटना घडली. अग्निशमन दलाने तत्परतेने महिलेला बाहेर काढल्याने तिचे प्राण वाचले.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार काेंढवा येथील एका शेतात असणाऱ्या 40 ते 50 फूट खाेल असलेल्या विहीरीत गंगा बबन राऊत या 50 वर्षीय महिनेले दुपारच्या सुमारास उडी मारली. याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच काेंढवा खुर्दच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाहणी केल्यानंतर ती महिला मोटारीच्या पाईपला धरून गटंगाळ्या खात होती. दलाच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न लावता लगेचच स्टेप लॅडर खाली विहरी मध्ये सोडली व दलाचे जवान सुभाष खाडे सेफ्टी बेल्ट घेऊन खाली उतरले. मात्र त्या महिलेचे वजन जास्त असल्यामुळे रेस्क्यु करताना खुप अडचणी येत होत्या. महिलेला सेफ्टी बेल्ट घालुन व कंबरेला एक सेफ्टी रस्सी बांधून स्टेपलॅडरच्या साह्याने दलाच्या जवानांनी व पोलिस कर्मचारी यांनी सुखरूप रित्या विहरीतून बाहेर काढले. व त्या महिलेस तिच्या मुलीच्या ताब्यात दिले. सदर ठिकाणी पोलिस कर्मचारी _ सुर्यवंशी व उजणे उपस्थित होते. सदर वर्दीवर दलाचे जवान अधिकारी अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण, रवी बारटक्के , सुभाष खाडे , आर्यन जवान टिळेकर, ठाकरे यांनी कामगीरी केली.