कुरकुंभ एमआयडीसीत पुन्हा अग्नितांडव; डीस्टीलेशन कंपनी खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 09:47 AM2020-10-01T09:47:44+5:302020-10-01T09:49:11+5:30
Kurkumbh Midc आगीचे प्रमुख कारण समजू शकले नाही.कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील अनेक मोठ्या रासायनीक कंपनीमधील रासायनीक प्रक्रिया झालेले विविध प्रकारच्या रसायनाच्या डीस्टीलेशनची प्रक्रिया या ठिकाणी केली जात असे.
कुरकुंभ : कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील शिवशक्ती ऑक्सिलेट प्लॉट न./८४-१ या डीस्टीलेशन कंपनीला पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे.
आगीचे प्रमुख कारण समजू शकले नाही.कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील अनेक मोठ्या रासायनीक कंपनीमधील रासायनीक प्रक्रिया झालेले विविध प्रकारच्या रसायनाच्या डीस्टीलेशनची प्रक्रिया या ठिकाणी केली जात असे.यामध्ये मोठ्या स्वरुपात अवैध रासायनीक साठा असल्याची माहिती समोर येत असुन सुरक्षेच्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा या ठिकाणी नसल्याचे दिसून आले.
अश्या प्रकारच्या अनेक छोट्या कंपन्या सध्या येथे कार्यरत असुन यामध्ये देखील रासायनीक ड्रम अस्तव्यस्त ठेवल्याने आगीच्या घटनेत यावर नियंत्रण मिळवता येत नाही.पहाटे उशिरापर्यंत या आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही.रासायनीक साठा संपूर्ण जळून गेल्यावर सुमारे चार वाजता आग विजली आहे.याबाबत आता पुढील कारवाई काय होणार हे पाहणे आवश्यक आहे.