भटारखान्यातील आगीत वस्तू जळून खाक; बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:52 PM2017-10-25T12:52:41+5:302017-10-25T12:55:39+5:30
बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील हॉटेल खुशबूच्या भटारखान्यात बुधवार (दि. २५) सकाळी अचानक आग लागली. सुदैवाने कसलीही जीवितहानी या दुर्घटनेत झाली नाही.
कोंढवा : बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील हॉटेल खुशबूच्या भटारखान्यात बुधवार (दि. २५) सकाळी अचानक आग लागली. आग लागल्याचे माहिती मिळाल्यावर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले व तीन बंबांच्या मदतीने आग विझवली. आगीमुळे खुशबू हॉटेलच्या भटारखान्यातील अनेक वस्तू आगीत जळल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने कसलीही जीवितहानी या दुर्घटनेत झाली नाही. आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती अग्निशामक दलातील जवानांनी दिली.
कोंढवा बुद्रुक फायर स्टेशनचे तांडेल, कैलास शिंदे, फायरमन शंकर नाइकनवरे, सुभाष खाडे, निलेश राजिवडे, अनिल सपकाळ, नवनाथ जावळे व त्यांच्या सहकार्यांनी ही आग लगेच विझवल्याने मोठी दुर्घटना टळली.