आगीत भुलेश्वर डाेंगर भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:10 AM2020-12-26T04:10:15+5:302020-12-26T04:10:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भुलेश्वर ; पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील श्री क्षेत्र भुलेश्वर मंदीराच्या डोंगरावर आग लागुन वन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भुलेश्वर ; पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील श्री क्षेत्र भुलेश्वर मंदीराच्या डोंगरावर आग लागुन वन विभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीने उग्र रुप धारण केल्याने संशयीत आरोपीने त्या ठिकाणाहुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, माळशिरस ग्रामस्थांनी पकडुन त्याला वन विभागाच्या ताब्यात दिले. आरोपीला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पुणे येथील मुंढावा परिसरात रहाणारे आशीष खुराना श्री क्षेत्र भुलेश्वर येथे नातेवाईकासह देवदर्शनासाठी आले होते. भुलेश्वर वन उद्यानाच्या कंपार्टमेंट मध्ये त्यांनी घरून आणलेले खाद्य पदार्थ गरम करण्यासाठी तीन दगडांच्या सह्याने चूल तयार करून शेजारील पाला पाचोळा पेटविल्यामुळे आग लागल्याचे स्वत: आशीष खुराना यांनी सांगीतले.
आगीचे उग्र रुप धारण केल्यानंतर माळशिरस गावातून ग्रामस्थांनी भुलेश्वर वन उद्यानाकडे धाव घेऊन आग विजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, गवत सुकलेले असल्याने आगीने उग्र स्वरूप धरण केले. यावेळी आशीष खुराना यांनी या ठिकाणा वरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले. वनाधिकाऱ्यांनी पंचनामा करून आशीष खुराना यांना ताब्यात घेतले व उद्या नायलयात हजार करणार असल्याचे संगितले
फोटो ओळ : श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथील डोंगरावर लागलेली आग