रांजणगाव वसाहतीतील कंपनीच्या केमिकल कचऱ्याला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:11 AM2021-03-08T04:11:48+5:302021-03-08T04:11:48+5:30
कंपनीच्या कचऱ्याला ...
कंपनीच्या कचऱ्याला आग लागल्याचे समजताच एमआयडीसीतील अग्निशमन केंद्रातील २ अग्निशमन बंबाच्या साहाय्याने आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, तरी दुपारपर्यंत आग सुरूच होती. कचऱ्याला लागलेली आग एवढी भीषण होती की, सुमारे ७ ते ८ कि.मी.पर्यंत दूूरवरुन धुराचे लोट दिसत होते. उन्हाची प्रचंड तीव्रता व केमिकलयुक्त कचरा त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागले. कारेगावचे कामगार तलाठी डी.के. वाळके तसेच रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे व अग्निशमन दलाचे अधिकारी व्ही.व्ही. तांडेल यांनी घटनास्थळी त्वरित भेट दिली. दरम्यान, याबाबत आगीच्या घटनेबाबत कंपनी प्रशासनाशी संपर्क होऊ शकला नाही.
फोटो :रांजणगाव एमआयडीसी येथील महाराष्ट्र इन्व्हायरो कंपनीच्या कचऱ्याला लागलेल्या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले.