इंदापूर तालुक्यातील कळस येथे दुग्ध प्रकल्पाला आग, प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 03:02 PM2021-03-23T15:02:00+5:302021-03-23T15:02:50+5:30

एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश

Fire in dairy project at Kalas in Indapur taluka | इंदापूर तालुक्यातील कळस येथे दुग्ध प्रकल्पाला आग, प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला

इंदापूर तालुक्यातील कळस येथे दुग्ध प्रकल्पाला आग, प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला

googlenewsNext

कळस: कळस (ता इंदापूर) येथील नेचर डिलाईट दुग्ध प्रकल्पात आगीची घटना घडली. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

आगीची माहिती समजताच बारामती नगर परिषद व छत्रपती साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली.  तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येथील नेचर डिलाईट डेअरी मधील दूध पावडर निर्मिती विभागात उंचावरील चेंबर मधून धुराचे लोट आकाशात उंच  दिसून लागल्याने आगीची घटना उघडकीस आली. त्यानंतर सर्व कामगारांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले. अग्निशामक यंत्रणेने काही कामगारांच्या मदतीने एक तासाच्या आग आग आटोक्यात आणली.दरम्यान आकाशातील धुराचे लोट पाहून बघ्यांनी गर्दी केली होती.

नेचर डिलाईट डेअरीचे संचालक मयूर जामदार आगीच्या घटनेबाबत म्हणाले, तापमान वाढीमुळे ही आग लागलेली असून यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही येथील यंत्रसामग्रीचे नुकसान झालेले आहे.

Web Title: Fire in dairy project at Kalas in Indapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.