बारामतीत इलेक्ट्रॉनिक शोरूमला भीषण आग कोट्यावधी रूपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 08:23 PM2019-05-12T20:23:41+5:302019-05-12T20:24:35+5:30

बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर असणाऱ्या महालक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स शोरूमला रविवारी (दि. १२) सकाळी दहाच्या दरम्यान भीषण आग लागली.

fire at electronic showroom in baramati | बारामतीत इलेक्ट्रॉनिक शोरूमला भीषण आग कोट्यावधी रूपयांचे नुकसान

बारामतीत इलेक्ट्रॉनिक शोरूमला भीषण आग कोट्यावधी रूपयांचे नुकसान

googlenewsNext

बारामती : बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर असणाऱ्या महालक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स शोरूमला रविवारी (दि. १२) सकाळी दहाच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीमध्ये शोरूममधील सर्व साहित्य व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या. सबंधीत शोरूम मालकाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत बारामती शहर पोलिस ठाण्यात उशीरापर्यंत कोणतिही तक्रार दाखल झाली नाही. त्यामुळे आगीचे नेकमे कारण व नुकसान समजू शकले नाही.
 
भिगवण रस्त्यावरील सेवा रस्त्यावर हे शोरुम असून सकाळी रस्त्यावरुन जाणाऱ्या काही नागरिकांना आतून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी याबाबत शोरूम मालकांना कळविण्यापूर्वीच आगीने रौद्र रुप धारण केले होते. काही क्षणातच आगीच्या ज्वाळा झेपावू लागल्या व धुराचे लोट बाहेर पडू लागले होते. या शोरुममध्ये असलेले टीव्ही, रेफ्रिजेटर्स, एअरकंडीशनर्स, मायक्राेव्हेव ओवन, पंखे, मिक्सर, कूलर्स, म्युझिक सिस्टिम अशा अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या. बारामती नगरपालिका, एमआयडीसीच्या अग्निशामक दलांनी आग तासाभराच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आणली. या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे. नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही. शोरुम व त्या मागे असलेल्या गोदामापर्यंत आग भडकलेली असल्याने नुकसानीची तीव्रता अधिक होती. साधनांचा अभाव असूनही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावून ही आग आटोक्यात आणली. 

दरम्यान आगीचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या एका पत्रकारास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुभाष मुंडे यांनी विनाकारण धक्काबुक्की केल्याचाही प्रकार घडला. याबाबत पत्रकारांनी शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरिक्षक मानसिंग खोचे यांना भेटून या घटनेचा निषेध नोंदविला.

Web Title: fire at electronic showroom in baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.