दौंडला फटाक्याच्या गोडाऊनला आग

By admin | Published: June 3, 2016 12:43 AM2016-06-03T00:43:48+5:302016-06-03T00:43:48+5:30

दौंड येथील अहिल्यादेवी होळकर सहकार चौकात फटाक्यांच्या गोडाऊनला आग लागून लाखोंचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

Fire in the firecracker godown fire | दौंडला फटाक्याच्या गोडाऊनला आग

दौंडला फटाक्याच्या गोडाऊनला आग

Next

दौंड : दौंड येथील अहिल्यादेवी होळकर सहकार चौकात फटाक्यांच्या गोडाऊनला आग लागून लाखोंचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. शहराच्या भरवस्तीत पोखरना यांचे हे गोडाऊन होते़ रात्री उशिरापर्यंत आग धुमसत होती़
आग लागल्यानंतर फटाक्याचे मोठेमोठे स्फोट झाले. त्यामुळे दौंड शहरासह अवघा परिसर हादरला. त्यामुळे नागरिकांमध्ये शंकाकुशंका निर्माण होऊन भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, फटाक्यांच्या गोडाऊनला आग लागल्याचे समजताच शहरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला.
फटाक्यांचे जसेजसे स्फोट होत होते, त्यानुसार आगीच्या ज्वाळा भडकत होत्या. घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली. मात्र, या गर्दीला पोलिसांना आवर घालता-घालता नाकेनऊ आले.
दौंड शुगर, दौंड नगर परिषद, कुरकुंभ औद्योगिक वसाहत येथील अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. शहरातील सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, पोलीस यंत्रणा यांनी आग विझविण्यासाठी जिवाची बाजी लावली.
फटाक्यांची तीव्रता भयानक असल्याने एकच गोंधळ झाला होता. तर, दुसरीकडे अचानक वारे सुरू झाल्याने आग पसरत गेली. गोडाऊनशेजारील गोडाऊन मालकाच्या घरात एका सिलिंडरने पेट घेतला होता. मात्र, सिलिंडरचा पेट वेळीच आवरल्याने पुढील अनर्थ टळला. तर, अन्य दोन सिलिंडर आग लागल्यानंतर घराबाहेर काढण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सायंकाळी साडेपाच वाजता सुरू झालेली ही आग सायंकाळी सातच्या सुमारास आटोक्यात आली.(वार्ताहर)

Web Title: Fire in the firecracker godown fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.