फुरसुंगी येथील कचरा डेपोला भीषण आग;सहा तास उलटूनही आग विझवण्यात अपयश 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 08:40 PM2021-04-02T20:40:55+5:302021-04-02T20:43:11+5:30

पालिकेनेच आग लावल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा गंभीर आरोप

A fire at the garbage depot at Fursungi-Uruli Devachi | फुरसुंगी येथील कचरा डेपोला भीषण आग;सहा तास उलटूनही आग विझवण्यात अपयश 

फुरसुंगी येथील कचरा डेपोला भीषण आग;सहा तास उलटूनही आग विझवण्यात अपयश 

googlenewsNext

फुरसुंगी- उरुळीदेवाची येथील कचरा डेपोला आज दुपारी दीडच्या सुमारास आग लागली. सायंकाळी वाऱ्याच्या वेगाने आग भीषण अजून भडकत राहिली. या आगीच्या लोटाने सुमारे 2 किलोमीटरच्या परिसरात धुराचे लोट पसरले आहे. याचवेळी पुणे महापालिकेच्या घनकचरा प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी ही आग लावली आहे असल्याच्या गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

गेल्या २५ वर्षात अनेकदा कचरा डेपोला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीचे स्वरूप भीषण आहे. ही आग १२ ते १५ एकरावर लागली आहे.तसेच सायंकाळी ७ पर्यंत आग विझवण्यात यश आलेले नव्हते. 

जो कचरा ओपन डम्पिंग केला आहे. तो जिरवायचा आहे. दोन्ही गावावर जो अन्याय केला आहे. तो सहन केला जाणार नाही असा इशारा नगरसेवक गणेश ढोरे यांनी सांगून निषेध व्यक्त केला आहे. धुराचे लोट वाढत होते. डेपोच्या लगत राहणारे लोकांना श्वसनाचा त्रास होत आहे. डेपो शेजारुन जाणाऱ्या रस्त्यावरील वाहनचालकांना धुराचा त्रास होत आहे. सारखी आग लागतेच कशी असा सवाल ढोरे यांनी केला आहे. ओपन डम्पिंग केलेला कचरा जिरवण्यासाठी ही आग लावली आहे. या कचरा डेपोच्या नावावर कोट्यावधी खर्च होत आहेत. दोन तासात ही आग विझवली गेली पाहिजे पुणे महापालिकेकडे तेवढी यंत्रणा नाही का असा सवाल ही त्यांनी केला.

सायंकाळी 7 वाजेपर्यत चार आगीचे बंब डेपोवर होते. आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र ती आटोक्यात येत नाही. ही आग कशी लागली असा सवाल कचरा डेपो हटाव संघर्ष समितीचे भगवान भाडळे यांनी केला आहे. गेले दोन वर्ष येथे आग लागली नाही. आताच कशी आग लागली असा सवाल करीत त्यांनी हे षंडयंत्र असल्याचा पालिकेवर आरोप केला आहे.

Web Title: A fire at the garbage depot at Fursungi-Uruli Devachi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.