पुण्यात मंडई येथे गोदामाला आग, दोन संसार उध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:54 PM2019-03-01T13:54:53+5:302019-03-01T13:56:08+5:30
शहरातील अखिल मंडई गणपती मंदिरा मागील बाजूस असणा?्या जुन्या वाड्यातील गोदामास आग लागल्याची घटना शुक्रवारी(दि.१) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
पुणे : शहरातील अखिल मंडई गणपती मंदिरा मागील बाजूस असणा?्या जुन्या वाड्यातील गोदामास आग लागल्याची घटना शुक्रवारी(दि.१) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या आगीत गोदामाशेजारील दोन घरे जळाली. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
मध्यवर्ती कार्यालयाचे स्टेशन अधिकारी समीर सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेआठच्या सुमारास मंडई गणपती मंदिरा मागील एका जुन्या वाड्यास आग लागल्याचा कॉल आला. यानंतर अग्निशामक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.त्यात ३ टँकर आणि ४ अग्निशमन विभागाच्या गाड्या यांचा समावेश होता. जुन्या वाड्याच्या मागील बाजूस असणा?्या एका गोदामाला ही आग लागली होती. त्यात जुनी बारदाने व अन्य वस्तू होत्या. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. गोदामाला लागलेल्या आगीत मात्र शेजारील दोन घरांना त्याची झळ बसून ती घरे जळाली आहेत. त्यात अनेक गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. घटनास्थळी शफीक सय्यद, योगेश दोडगे, रौफ शेख, मंगेश मिळवणे यांनी प्रयत्नपूर्वक आग आटोक्यात आणली.