कात्रजमधील एटीएमच्या इलेक्ट्रीक कंट्राेल पॅनल रुमला अाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 04:10 PM2018-05-22T16:10:00+5:302018-05-22T16:10:00+5:30
कात्रज येथील एचडीएफसी बॅंकेच्या एटीएमच्या इलेकट्रीकल कंट्राेल पॅनल असलेल्या रुमला अाग लागली. या अागीत साधारण सात लाख रुपयांचे नुकसान झाले.
पुणे : कात्रज येथील एचडीएफसी बॅकेच्या एटीएमच्या इलेकट्रीक कंट्राेल पॅनल असलेल्या रुमला अाग लागल्याची घटना दुपारी 2.15 सुमारास घडली. या अागीत इलेक्ट्रीकल कंट्राेल रुम पूर्णपणे जळूण खाक झाली.
अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 2.15 च्या सुमारास कात्रज येथील माेरे बागेजवळील एका इमारतीमध्ये असलेल्या एटीएमच्या इलेक्ट्रीक कंट्राेल पॅनलच्या खाेलीला अाग लागली हाेती. अाग लागल्याचे समजताच अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अागीने इलेक्ट्रीक कंट्राेल पॅनलच्या रुमला घेरले हाेते. अग्निशामक दलाकडून पाण्याचा मारा करत अाग अाटाेक्यात अाणण्यात अाली. या अागीत या रुममधी इलेक्ट्राॅनिक वस्तू, एटीएमचे एसी तसेच सीसीटिव्ही कॅमेरे जळूण खाक झाले. एटीएम मशीनला अागीची झळ पाेहचली असली तरी एटीएममधील पैशांचे कुठलेही नुकसान झाले नाही. परंतु या रुममधील साधारण 7 लाख रुपयांचे सामान जळूण खाक झाल्याची माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात अाली.
ही अाग विझवण्यात कात्रज फायर स्टेशनचे कर्मचारी जयवंत तळेकर, अानंदा जागडे, सुनिल निकम, जयेश लबडे, सागर इंगळे, तुषार पवार , श्रीकांत वाघमाेडे यांनी सहकार्य केले.