पुण्यात घरगुती सिलेंडरच्या वायु गळतीने आग; एक महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 01:57 PM2022-09-27T13:57:04+5:302022-09-27T14:01:26+5:30

नवरात्रीमुळे देवघरात असणाऱ्या समईतील दिवा रात्रभर सुरू असल्याने पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली...

Fire in house due to air leakage of household cylinder; A woman was injured | पुण्यात घरगुती सिलेंडरच्या वायु गळतीने आग; एक महिला जखमी

पुण्यात घरगुती सिलेंडरच्या वायु गळतीने आग; एक महिला जखमी

googlenewsNext

धायरी (पुणे) : गॅस सिलेंडरच्या वायु गळतीने घरामध्ये आग लागल्याने एक महिला जखमी झाली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास नऱ्हे परिसरात घडली. चैञाली ईश्वर मांढरे (वय: २९ वर्षे, रा. सोनाई निवास, भैरवनाथ मंदिराजवळ, नऱ्हे,पुणे) असे आगीत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. 

सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे भागातील भैरवनाथ मंदिराजवळ असणाऱ्या सोनाई निवास या चार मजली इमारतीमध्ये मांढरे कुटुंबीय राहतात. सर्व कुटुंबीय रात्री जेवण करून घरात झोपले होते. त्यानंतर  घरात असणाऱ्या गॅस सिलेंडरची वायु गळती झाली. मात्र नवरात्रीमुळे देवघरात असणाऱ्या समईतील दिवा रात्रभर सुरू असल्याने पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली.

पहिल्या मजल्यावर असलेल्या घरामध्ये सोप्यावर झोपलेल्या चैत्राली मांढरे यांना आगीचे चटके बसले असून त्यात त्यांच्या हाताला भाजले असून त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. तर त्यांची सासू व सासरे हे तळमजल्यात असणाऱ्या खोलीत झोपले असल्याने ते बचावले आहेत.

घटनेची माहिती मिळताच सनसिटी अग्निशमन दलाचे जवानानी घटनास्थळी पोहोचताच घरामधील वायुगळती असणारा सिलेंडर प्रथमतः बाहेर काढत जवानांनी पाण्याचा मारा करत गृहपयोगी वस्तुंना लागलेली आग इतरत्र पसरु न देता पूर्ण विझवत पुढील धोका टाळला. या घटनेत घरातील साहित्य जळून खाक झाले आहे. यावेळी जवानांनी घरातील मोकळे इतर दोन सिलेंडर बाहेर काढले व सुरक्षेच्या कारणास्तव वायुगळती होत असलेला सिलेंडर स्वतच्या ताब्यात घेतला.

सिंहगड अग्निशमन केंद्र अधिकारी प्रभाकर उम्राटकर, तांडेल पांडुरंग तांबे, वाहन चालक संतोष चौरे व फायरमन नितीन मोकाशी, सतीश डाकवे, संजू चव्हाण तसेच मदतनीस कोकरे, जाधव आदी जवानांनी आग आटोक्यात आणली.  

नवरात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली धाव...
मांढरे कुटुंबियांच्या घराजवळच अखिल नऱ्हेगाव मित्रमंडळ नावाचे सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ आहे. जखमी झालेल्या चैत्राली मांढरे यांचे पती ईश्वर मांढरे हे या सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळात असणाऱ्या मंडपात झोपले होते. आग लागल्याचे समजताच त्यांच्यासह मंडळाचा कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच आगीत जखमी झालेल्या चैत्राली मांढरे यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Web Title: Fire in house due to air leakage of household cylinder; A woman was injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.