पुण्यात १४ ठिकाणी आगीच्या घटना; कोणतीही जिवितहानी नाही, फटाक्यांमुळे लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 11:29 PM2024-11-01T23:29:28+5:302024-11-01T23:30:57+5:30
पुण्यात आज वेगवेगळ्या १४ ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागल्याची घटना घडली.
पुण्यात आज वेगवेगळ्या १४ ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागल्याची घटना समोर आली. या आगीत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. अग्निशमन गाड्यांनी लगेच ही आग आटोक्यात आणली. या आगीच्या घटना रात्री ७ ते ९ च्या दरम्यान घडल्या आहेत. सायंकाळी ७.३५ वाजता कळस येथे रस्यावर कचरा पेटला यामुळे मोठी आग दिसत होती. तर मोरे वस्ती येथे ऊसाच्या शेतामध्ये आग लागली.
फटाक्यांमुळे अचानक लागलेल्या आगीमुळे मोठा गोंधळ उडाला. वेळीच अग्निशमन विभागाने प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली.
पुण्यात या ठिकाणी लागली आग
१) रात्री ०७.३५ - कळस येथे रस्यावर कचरा पेटला (धानोरी अग्निशमन केंद्र वाहन)
२) ०७.३६ - मांजरी, मोरे वस्ती येथे ऊसाच्या शेतामध्ये आग (हडपसर अग्निशमन केंद्र, एक वॉटर टँकर)
३) ०८.०५ - बालेवाडी फाटा, काका हलवाई स्वीट समोर वायर पेटली (पाषाण अग्निशमन केंद्र वाहन)
४) ०८.०६ - कोथरुड, रामबाग कॉलनी येथे झाडाला आग (कोथरुड अग्निशमन केंद्र वाहन)
५) ०८.१२ - मार्केटयार्ड, गेट क्रमांक पाचजवळ कचरयाच्या वाहनामधील कचरा पेटल्याने आग (गंगाधाम अग्निशमन केंद्र वाहन)
६) ०८.१९ - सहकारनगर पोलिस चौकीजवळ नारळाच्या झाडाला आग (जनता अग्निशमन केंद्र वाहन)
७) ०८.२२ - मंगलदास रस्ता येथे झाडाला आग (नायडू अग्निशमन केंद्र वाहन)
८) ०८.२४ - गणेश पेठ, बुरुड आळी येथे ताडपञी पेटल्याने आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)
९) ०८.३० - काञज, संतोषनगर येथे इमारतीच्या गॅलरीमध्ये आग (काञज अग्निशमन केंद्र वाहन)
१०) ०८.३४ - रविवार पेठ, तांबोळी मस्जिद नजीक कपड्याच्या दुकानात आग (कसबा अग्निशमन केंद्र वाहन)
११) ०८.३८ - बी टी कवडे रस्ता, भारत फोर्ज कंपनी समोर एका ट्रकला आग (बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र वाहन)
१२) ०८.४० - लक्ष्मी रोड, विजय टॉकीज जवळ घरामध्ये आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)
१३) ०८.४५ - कळस स्मशानभूमी जवळ एका शेतामध्ये आग (धानोरी अग्निशमन केंद्र वाहन)
१४) ०८.५४ - टिळक रस्ता, महाराष्ट्र मंडळ शेजारी झाडाला आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)