ओंकारेश्वर मंदिराच्या आवारात आग ; अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:18 PM2018-05-08T12:18:06+5:302018-05-08T12:18:06+5:30
मंगळवारी सकाळी अग्निशमन दलाला ओंकारेश्वर मंदिरामधे गॅस सिलेंडरने पेट घेतला असून आग लागल्याची माहिती मिळाली. मंदिराच्या आवारात आगीचा प्रकार लक्षात घेऊन तातडीने कसबा अग्निशमन केंद्राचे वाहन रवाना झाले.
पुणे - शनिवार पेठेतील प्राचीन ओंकारेश्वर मंदिराच्या मंदिरात गॅस गॅस गळतीमुळे सिलेंडरने पेट घेत आग लागल्याची घटना घडली. मात्र, कसबा अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखविलेल्या तत्परतेने आग आटोक्यात आणताना मोठा अनर्थ टळला.
मंगळवारी सकाळी अग्निशमन दलाला ओंकारेश्वर मंदिरामधे गॅस सिलेंडरने पेट घेतला असून आग लागल्याची माहिती मिळाली. मंदिराच्या आवारात आगीचा प्रकार लक्षात घेऊन तातडीने कसबा अग्निशमन केंद्राचे वाहन रवाना झाले. जवान तेथे पोहचताच जवान हरिश बुंदेले यांनी एका खोलीमधून प्रचंड धुर येत असून एका घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरने पूर्ण पेट घेतला असल्याचे पाहिले. त्यांनी व त्यांच्या इतर जवानांनी क्षणाचाही विलंब न करता व मंदिराची परिस्थिती पाहता पाण्याचा मारा करुन सिलेंडरची आग पूर्णपणे विझवली.अग्निशमन दल वेळेत पोहोचल्याने गॅसचा स्फोट झाला नाही तर गॅस शेगडी पेटवत असताना सिलेंडरमधून गॅसगळती झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
सदर कामगिरीमधे कसबा अग्निशमन केंद्राचे वाहनचालक चंद्रकात जगताप, जवान अनिल करडे, हरिश बुंदेले, राजू जगदाळे,विठ्ठल आढारी यांनी सहभाग घेतला.