पुण्यातील 'आयसर'च्या दुसऱ्या मजल्याला आग; कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 06:27 PM2021-07-16T18:27:16+5:302021-07-16T19:04:59+5:30

काही मिनिटामध्ये आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे

Fire on the second floor of IISER in Pune; Burn all the ingredients | पुण्यातील 'आयसर'च्या दुसऱ्या मजल्याला आग; कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही

पुण्यातील 'आयसर'च्या दुसऱ्या मजल्याला आग; कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही

googlenewsNext
ठळक मुद्देआग पाण्याच्या चार टॅंकर्सच्या मदतीने आटोक्यात

पुणे: बाणेर परिसरातील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयआयएसईआर) या संस्थेत शुक्रवारी आगीची घटना घडली. आयआयएसईआर शिक्षण संस्थेच्या दुसर्‍या मजल्याला आग लागली. मात्र या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.  

पुण्यातील बाणेर येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेला च्या दुसर्‍या मजल्याला आग लागली होती. संस्थेतील दुसऱ्या एका कर्मचाऱ्याला दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कोपऱ्यातून धूर येत असल्याचे कर्मचार्‍यांना दिसले. त्या घटनेची माहिती आम्हाला मिळताच, काही मिनिटात घटनास्थळी पोहोचलो. मात्र तोवर आगीने दुसर्‍या मजल्यावरील साहित्य संपूर्ण जळून खाक झाले. अग्निशामक दलाच्या अधिकार्‍यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, मजल्याच्या आतमधील बाजूस प्रचंड धूर असल्याने आगीवर नियंत्रण मिळविताना अडचणी आल्या. मात्र पुढील काही मिनिटामध्ये आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. तसेच ही आग कोणत्या कारणामुळे लागली हे समजू शकले नाही. ही आग पाण्याच्या चार टॅंकर्सच्या मदतीने आटोक्यात आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रयोगशाळेत काम करत असलेला एक विद्यार्थी या दुर्घटनेमध्ये किरकोळ जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत आणि आता त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या करोना प्रादुर्भावामुळे या शिक्षणसंस्थेमध्ये मोजकेच विद्यार्थी राहत आहेत. तसंच प्रयोगशाळेत जाऊन शिक्षण घेणाऱ्या अथवा प्रयोग करणाऱ्यांची संख्याही मर्यादित आहे.

Web Title: Fire on the second floor of IISER in Pune; Burn all the ingredients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.