शिरसगाव काटा येथे आगीत शेतमजुरांच्या चार झोपड्या जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:10 AM2021-04-07T04:10:16+5:302021-04-07T04:10:16+5:30
याबाबत कामगार तलाठी योगेश टिळेकर यांनी सांगितले की, शिरसगाव काटा येथील मानेमळा येथे काही शेतमजुरांची घरे असून ती ...
याबाबत कामगार तलाठी योगेश टिळेकर यांनी सांगितले की, शिरसगाव काटा येथील मानेमळा येथे काही शेतमजुरांची घरे असून ती रोजंदारी व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत. दुपारी अचानक आग लागून यातील चार कुटुंबाच्या छपराच्या घरास आग लागून घरातील संसारोपयोगी सर्व साहित्य, भांडी, कपडे जळून खाक झाली. या लागलेल्या आगीत मोहन बरडे, रामदास जाधव, चंदा शिंदे, सुलभा माळी या शेतमजूर कुटुंबाच्या झोपड्या जळून खाक झाल्या असून एक लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती तलाठी टिळेकर यांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच नरेंद्र माने, सतीश चव्हाण, सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी भेट देत कुटुंबाची चौकशी केली आहे. तर शिरूर येथील सामाजिक कार्यकर्त्या वैशाली चव्हाण यांनी या कुटुंबांना तातडीने मदत व्हावी यासाठी पुढाकार घेतला असून समाजातील दानशूर व्यक्तींनी या कुटुंबांना सावरण्यासाठी मदत देत पुढे यावे, असे आवाहन वैशाली चव्हाण यांनी केले आहे.
शिरसगाव काटा येथील माने मळात अचानक आग लागून मजुरांच्या झोपड्या खाक झाल्या.