तळजाई वनविहारमध्ये आग, १५ दिवसांत तिसऱ्यांदा प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 03:34 AM2018-04-04T03:34:18+5:302018-04-04T03:34:18+5:30
गेल्या पंधरा दिवसांमध्ये तळजाई वनविहारामध्ये तिसºयांदा आग लागली. ही आग विझविण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी प्रयत्न केले.
सहकारनगर - गेल्या पंधरा दिवसांमध्ये तळजाई वनविहारामध्ये तिसºयांदा आग लागली. ही आग विझविण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी प्रयत्न केले.
१ सध्या उन्हाळा वाढल्यामुळे तळजाई वनविभागाच्या परिसरात आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. गेल्या पंधरा दिवसांतील ही तिसरी आग आहे. ही आग मोठी असल्याने अनेक झाडे जळून गेली आहेत. टेलस आॅर्गनायझेशनचे लोकेश बापट, संकेत जोगळेकर, जान्हवी बापट व किमया बापट यांनी सुमारे अडीच तास आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
२ या कार्यकर्त्यांनी कॅँडने पाणी आणून आग विझविली. दरम्यान, २ ते ३ एकरामध्ये ही आग पसरली होती. या आगीमुळे अनेक मोर, लांडोर, ससे व पक्षी सैरावैरा पळत होते. काही वेळाने या भागातील सुरज शिंदे, गणेश ठोंबरे,वैभव लोहार, रोहित देशमुख व वनविहारा मधील दिलीप वासवंड यांनी समजल्यावर यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली व आग विझ्विण्यास सहकार्य केले.
तळजाई वनविभागाच्या परिसरात उन्हाळ्यामुळे मोठी आग लागली होती.
ही आग पर्यावरणप्रेमींनी विझविण्यासाठी प्रयत्न केले.
आगीमध्ये अनेक ठिकाणचे झाडे जळून गेली.