महाविद्यालयांना आगीचा धोका

By admin | Published: July 19, 2015 03:58 AM2015-07-19T03:58:18+5:302015-07-19T03:58:18+5:30

शैक्षणिक संस्थांमध्ये अग्निशमन यंत्र बसविणे आवश्यक आहे. मात्र, शहरातील बहुतांश शाळा व महाविद्यालयांमध्ये अग्निशमन यंत्रच उपलब्ध नाहीत.

Firearms to colleges | महाविद्यालयांना आगीचा धोका

महाविद्यालयांना आगीचा धोका

Next

पुणे : शैक्षणिक संस्थांमध्ये अग्निशमन यंत्र बसविणे आवश्यक आहे. मात्र, शहरातील बहुतांश शाळा व महाविद्यालयांमध्ये अग्निशमन यंत्रच उपलब्ध नाहीत. तर, काही ठिकाणच्या यंत्रांची मुदत संपलेली आहे. परिणामी, शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आपत्कालीन परिस्थितीत असुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यात बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा लागू करण्यात आला. कायद्यातील तरतुदीनुसार प्राथमिक शाळा व विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र, शहरातील अनेक शाळांमध्ये अग्निशमन यंत्रच नाहीत, असे ‘लोकमत’च्या पाहणीमध्ये उघड झाले आहे. महाविद्यालयांमध्येही अग्निशमन यंत्रणा बसविण्याचे बंधन घालण्यात आले आहे.परंतु, त्याचे काटेकोर पालन होत नसल्याचे समोर आले. अग्निशमन यंत्रे शाळांना देऊन शासन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेईल, मात्र, ही यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण शिक्षक व विद्यार्थ्यांना द्यायला हवी.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणत्याच उपाययोजना नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निकाल देताना न्यायालयाने प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची उपाय करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांत अग्निशमन यंत्रे देण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेच्या सर्व शाळांमध्ये अग्निशमन यंत्र बसवून विद्यार्थी व शिक्षकांना अग्निशमन यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. मात्र, इतर शाळांंमधील अग्निशमन यंत्र खरेदीची आणि देखभालीची जबाबदारी कोणी घ्यावी, असा प्रश्न पडतो. पुणे शहरात अग्निशमन यंत्रांच्या देखभालीसाठी २५ एजन्सीज आहेत. त्यांनी दर सहा महिन्यांनी या यंत्रांचा आढावा घेऊन अहवाल सादर देणे गरजेचे आहे.
- प्रशांत रणपिसे, मुख्य अग्निशामक अधिकारी, पालिका

Web Title: Firearms to colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.