अग्निशमन दलाच्या जवानांनी करून दाखवले, अन कुत्र्याला प्लास्टिक डब्यातून सुखरूप सोडवले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 03:17 PM2021-06-01T15:17:25+5:302021-06-01T15:18:11+5:30

प्लास्टिकच्या डब्यात अडकले होते कुत्र्याचे तोंड, माहिती मिळताच जवान घटनास्थळी दाखल

Firefighters performed, and the dog was rescued from a plastic box | अग्निशमन दलाच्या जवानांनी करून दाखवले, अन कुत्र्याला प्लास्टिक डब्यातून सुखरूप सोडवले

अग्निशमन दलाच्या जवानांनी करून दाखवले, अन कुत्र्याला प्लास्टिक डब्यातून सुखरूप सोडवले

Next
ठळक मुद्देजवानांनी दक्षता घेऊनच कात्री आणि कटरच्या साहाय्याने कुत्र्याला सोडवले

पुणे: शहरात झाडपडी, आग, वाडे - इमारती कोसळणे अशा अनेक घटना घडल्यावर अग्निशमन दलाचे जवान तातडीने धावून येतात. स्वतःच्या जीवाची परवा न करता सर्वांना संकटातून बाहेर काढण्यासाठी खंबीरपणे उभे असतात. माणसासोबतच मुक्या प्राण्यासाठीसुद्धा त्यांची धावपळीची तयारी दिसून येते. अशाच घटनेत आज सकाळी अग्निशमन दलाच्या जवानांना मार्केटयार्ड येथे एक कुत्रे संकटात असल्याची माहिती मिळाली. येथे शिवाजी पुतळ्याजवळ कुत्र्याच्या तोंडात प्लास्टिक डबा अडकला होता. जवानांनी त्याच क्षणी घटनास्थळी पोचून कुत्र्याची या डब्यातून सुटका केली. 

सकाळी पावणे आठच्या सुमारास अग्निशमन दलाला कॉल आला होता. स्थानिक रहिवाशांनी कुत्र्याच्या तोंडात प्लास्टिक डबा अडकल्याची माहिती दिली. त्यानंतर फायर ब्रिगेड 2 आणि देवदूत चे 2 असे चार जवान घटनास्थळी दाखल झाले. कुत्र खूपच घाबरले होते. त्याच्या हालचालीमुळे जवानांना डबा काढण्यात अडचणी येऊ लागल्या. अशा परिस्थितीत कुत्र्याच्या तोंडापासून मागे नेट ( जाळी ) लावण्यात आली.

दोन जवानांनी व्यवस्थितरित्या त्याला धरले. कात्री आणि कटरचा वापर करून डबा एका बाजूने कापण्यास सुरुवात केली. कुत्र्याला कात्री लागणार नये याची ते दक्षताही घेत होते. अखेर डब्याच्या दोन्ही बाजूने कापून त्याची सुखरूप सुटका केली. यावेळी घटनास्थळी दिगंबर बांदवडेकर, राजेश कांबळे, परेश जाधव आणि चंद्रकांत मेनसे या जवानांनी अथक परिश्रम घेतले. 

Web Title: Firefighters performed, and the dog was rescued from a plastic box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.