हडपसरमध्ये गोळीबार, आई मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 07:16 PM2018-03-14T19:16:56+5:302018-03-14T19:16:56+5:30
स्कॉर्पिओ गाडी जाळणाऱ्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्याच्या तयारीत असलेल्या आईवर गोळीबार व मुलावर गोळीबारांसह कोयत्याने वार केला. दोघांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडला.
हडपसर: गाडी जाळणाऱ्यांच्या विरोधात पोलीस तक्रार देण्याबाबत आई-मुलामध्ये बोलणे सुरु असताना आईला घराबाहेर काढून कपाळावर गोळी झाडली. त्यामध्ये त्या जखमी झाल्या. त्यावेळी आईला वाचवण्यासाठी अंगावर धावून जाणाऱ्या मुलांवर देखील गोळीबार करून कोयत्याने वार केला आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार हडपसर येथील रामटेकडी येथे मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. याप्रकरणी आठ जणांवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,विक्कीसिंग डिडिसिंग कल्याणी, विकिंसिंग जालिंदरसिंग कल्याणी,माखनसिंग कल्याणी,हुकुमसिंग कल्याणी,खात्रसिंग कल्याणी, सचिन बावरी ,जगदीप कल्याणी, जॉकीसिंग कल्याणी,(सर्व रा. रामटेकडी )अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर उजालासिंग टाक ( वय २४, रामटेकडी) या तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादींची स्कॉर्पिओ गाडी रविवारी रात्री जाळण्यात आली होती. ही गाडी विक्कीसिंग डिडिसिंग कल्याणी व त्याच्या साथीदारांनी जाळल्याचे उजालासिंग टाक ला समजले. त्यानंतर तो आणि त्याची आई यांनी कल्याणी व त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याची फिर्यादीची आई लोकांमध्ये बोलत होती. मंगळवारी रात्री ११च्या सुमारात विक्कीसिंग कल्याणी व त्याच्या इतर साथीदार हातात कोयता व बंदूक घेऊन आले. विक्कीसिंग जालिंदरसिंग कल्याणी यांनी फिर्यादीच्या आईला घराबाहेर काढून तिच्या कपाळावर बंदूक लावली. त्यानंतर बंदुकीची गोळी झाडत जखमी देखील केले. यानंतर उजालासिंग हा वाचवण्यासाठी आला असता त्याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर उजाळा सिंह यांचे भाऊ बिलूसिंह व ज्वालासिंह यांच्यावर विक्कीसिंग डिडिसिंग कल्याणी याने कोयत्याने वार करून गंभीर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहे.