कोरेगाव पार्कमध्ये गोळीबार; वाढदिवसाची पार्टी आटोपून घरी निघालेल्या तरुणावर खुनी हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 10:25 AM2022-11-25T10:25:36+5:302022-11-25T10:27:00+5:30

गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली...

Firing in Koregaon Park; Murderous attack on a young man who was going home after his birthday party | कोरेगाव पार्कमध्ये गोळीबार; वाढदिवसाची पार्टी आटोपून घरी निघालेल्या तरुणावर खुनी हल्ला

कोरेगाव पार्कमध्ये गोळीबार; वाढदिवसाची पार्टी आटोपून घरी निघालेल्या तरुणावर खुनी हल्ला

googlenewsNext

पुणे/प्रतिनिधी/किरण शिंदे : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये मित्रांसोबत वाढदिवस साजरा करून घरी परत जाण्यासाठी निघालेल्या एका तरुणावर खुनी हल्ला करण्यात आला. हवेत गोळीबार ही करण्यात आलाय. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इमरान हमीद शेख (वय 30, ताडीवाला रोड, बंडगार्डन) यांनी तक्रार दिली आहे. सागर कोळनट्टी (वय 36)असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सोन्या दोडमणी, नक्की उर्फ रोहण निगडे, नितीन म्हस्के, धार आज्या यांच्यासह चार ते पाच जण विरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे आपल्या काही मित्रांसोबत कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल रॉक वॉटर येथे मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी एकत्र जमले होते. पार्टी संपल्यानंतर दुचाकीने परत जात असताना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आरोपी सोन्या दोडमनी आणि इतरांनी पूर्वीच्या कारणावरून सागर कोळनटी त्याच्यावर प्राण घातक हल्ला केला. आरोपी सोन्या याने कमरेला लावलेली बंदूक काढून हवेत गोळीबार केला. तर इतर आरोपींनी फुटपाथवर पडलेल्या पेपर ब्लॉकने त्याच्या तोंडावर जबर मारहाण केली. यामध्ये सागर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. तर फिर्यादीसह इतरजण जखमी झाले आहेत. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Firing in Koregaon Park; Murderous attack on a young man who was going home after his birthday party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.