इंदापूर शहरात गोळीबार ; एक जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 05:50 PM2019-08-31T17:50:35+5:302019-08-31T17:57:57+5:30
तुम्हांला लय माज आला आहे काय.. असे म्हणुन त्याच्या हातातील पिस्तूलाने फिर्यादी यांचे दिशेने फायरिंग करण्यास सुरुवात केली.
इंदापूर : जुन्या भांडणाचा वादावरून इंदापूर शहरातील श्रीराम सोसायटी येथे सात जण व अनोळखी चार जणांनी गोळीबार करून एकास गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी रात्री १२. ३० वाजता घडली असून यामध्ये लक्ष्मण सुभाष धनवे, रा. श्रीराम सोसायटी, इंदापूर, ता इंदापूर हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत रोहित मनोज इंगळे ( वय २० ) रा. श्रीराम हौशिंग सोसायटी, इंदापूर ) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये आरोपी अतुल शेटे पाटील, सोमनाथ खरवडे, बंटी पाचनकर, भैय्या चित्राव, सुमित साळुंखे, विठ्ठल महाडिक, शंभू पवार व तसेच इतर ४ जण, (सर्व रा. मेन पेठ, इंदापूर, ता इंदापूर जि. पुणे ) असे आरोपींची नावे असून, यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदापूर शहरातील श्रीराम सोसायटीत खिलारे यांच्या दुकानासमोर रोहित इंगळे व त्याचा मित्र लक्ष्मण सुभाष धनवे, संतोष भगवान साळुंखे असे गप्पा मारत बसले असताना, यातील आरोपी यांनी त्यांची डस्टर कार क्रमांक (एमएच १७७०) तसेच ३ मोटरसायकलवरून येवून फिर्यादी व त्यांचे मित्रांना त्यांच्याशी पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपी नंबर एक अतुल शेटे पाटील म्हणाला की, तुम्हांला लय माज आला आहे काय.. असे म्हणुन त्याच्या हातातील पिस्तूलाने फिर्यादी यांचे दिशेने फायरिंग करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी फिर्यादी व त्यांचे मित्र घाबरून इकडे तिकडे पळत असताना लक्ष्मण धनवे यांच्या उजवे पायाच्या पिंडरीवर गोळी लागून, तो जखमी होवून जमिनीवर पडला. त्यावेळी त्याच्या पायाला गोळी लागून जखम झाली.
त्यांनतर उर्वरीत सहा आरोपी व अनोळखी चार जनांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडके व लोखंडी रॉड घेवून फिर्यादी व त्यांचे मित्रांना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग केला, त्यावेळी फिर्यादी व त्यांचे मित्र अंधाराचा व गल्लीबोळाचा फायदा घेवुन तेथुन पळून गेले व पुढील गल्लीच्या एका बोळात जावून लपले.
त्यावेळी आरोपींची फिर्यादीच्या मोटारसायकलची तोडफोड करून नुकसान केले व शिवीगाळ दमदाटी करून निघून गेले अशा आशयाची फिर्याद इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे करीत आहेत. तर बारामती विभागाचे पोलीस अधीक्षक नारायण शिरगावकर यांनी भेट दिली आहे.यामधील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आरोपींनी सात गोळ्या फायरिंग केल्याचे घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी सांगितले.
______:________
चौकट : सर्व आरोपींना लवकरच ताब्यात घेणार
सदर घटना घडल्यानंतर बारामती विभागीय पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली व लोकमतशी बोलताना सांगितले की,सदर घटनेतील आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
_______________
दोन मोटारसायकल व रुग्णवाहिकेचे नुकसान
या घटनेमध्ये आरोपींकडून सोसायटीमधील पल्सर एम. एच. ४२ ए.बी १८६६ चे गाडीची टाकी, बॅटरी फोडून नुकसान, एम एच १४ बी एस ८२६३ चे स्प्लेडस गाडीच्या टाकीचे नुकसान तसेच पै. स्व. पांडुरंग रामचंद्र खिलारे ( गुरुजी ) प्रतिष्ठान च्या रुग्णवाहिका (क्रमांक एमएच. ४२ ए.क्यू. ९००९ )चे पाठीमागून गोळी लागून पत्रा फाटला असून तीन गाड्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.
______________