राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर फायरिंग; ५ गोळ्या झाडल्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 10:31 PM2024-09-01T22:31:05+5:302024-09-01T22:32:43+5:30

गोळ्या मारण्याच्या आधी त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

firing on ncp former corporator vanraj andekar in pune | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर फायरिंग; ५ गोळ्या झाडल्या 

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर फायरिंग; ५ गोळ्या झाडल्या 

पुणे: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर फायरिंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांना पाच गोळ्या लागल्यामुळे केइएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गोळ्या मारण्याच्या आधी त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घरगुती वादातून वनराज आंदेकर बंडु आंदेकर चा जावई आणि वनराजचा दाजी गणेश कोमकर याने फायरिंग केल्याचे समजते. गणेश कोमकर याने काही वर्षांपूर्वी शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ पारेख याच्यांवर अॅसिड हल्ला केला. दरम्यान वनराज आंदेकरची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात घबराट उडाली. गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनराज यांच्यावर निकटवर्तीयाने गोळीबार केला असून, कौटुंबिक वाद तसेच वर्चस्वाच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. नाना पेठेत आंदेकर टोळीचा दबदबा आहे.

पुणे महापालिकेच्या २०१७ सालचा निवडणुकीमध्ये वनराज आंदेकर  हे राष्ट्रवादी काँग्रेस मधून नगरसेवक  म्हणून निवडून आले . त्या अगोदर वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या २००७ आणि २०१२  या दोन वेळा नगरसेविका होत्या  वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकात आंदेकर  हेही नगरसेवक होते. वत्सला आंदेकर यांनी पुणे शहराचा महापौरपद  भुषविले आहे.

आंदेकर  टोळी गेली पंचवीस वर्ष पुण्यात गुन्हेगारी कारवाया करत असून प्रमोद माळवदकर या गुंडाच्या खुनाच्या प्रकरणी बंडू उर्फ  सूर्यकांत आंदेकर याला जन्मठेपेची शिक्षा ही झालेली आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न खंडणी मारामारी यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत आंदेकरविरुद्ध १९८५ पासून खून, खुनाचे प्रयत्‍न, धमक्या देणे, शस्त्रे बाळगणे, अपहरण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे पुण्यातील फरासखाना, खडक व समर्थ या पोलीस ठाण्यात, तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

आंदेकर-माळवदकर टोळीयुद्धातून झालेल्या खूनप्रकरणात सूर्यकांत आंदेकरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जन्मठेपेची शिक्षा भोगून आल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी कारवायांना सुरुवात केली. त्याच्या दहशतीमुळे स्थानिक नागरिक तक्रार करण्यासही पुढे येत नव्हते. सू्र्यकांत आंदेकरचा भाऊ उदयकांत हा पुणे महापालिकेत 2012 पासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नगरसेवक होता.  गेली काही वर्ष आंबेकर टोळीचा वरचष्मा कमी झालेला होता आणि त्यातूनच अतुल कुडले याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचं पोलिसांनी सांगितले. गेले काही दिवस कुडले याच्यामुळे आपल्या टोळीचा वर्चस्व कमी होत असल्याचा राग आंदेकर टोळीत होता.

Web Title: firing on ncp former corporator vanraj andekar in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.