Pune: शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातच साक्षीदारावर गोळीबार; एकास जामीन
By नम्रता फडणीस | Updated: September 18, 2023 16:18 IST2023-09-18T16:15:55+5:302023-09-18T16:18:06+5:30
ही घटना ७ मार्च २०१९ रोजी घडली होती. या प्रकरणात त्याला १३ मार्च रोजी अटक करण्यात आली होती...

Pune: शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातच साक्षीदारावर गोळीबार; एकास जामीन
पुणे : शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात साक्षीदारावर गोळीबार केल्याप्रकरणी रोहन चंदेलिया उर्फ छोटा रावण याचा जामीन अर्ज सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी मंजूर केला. त्याने ॲड. अमित यादव, ॲड प्रिया मुळे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. ही घटना ७ मार्च २०१९ रोजी घडली होती. या प्रकरणात त्याला १३ मार्च रोजी अटक करण्यात आली होती.
त्याने गुन्हा केला नाही. सहआरोपीला जामीन झाला आहे. अर्जदाराची भूमिका आणि तो अधिक काळ तुरुंगात असल्याची वस्तुस्थिती लक्षात घेऊन व गोळीबार केल्यानंतर घटनास्थळी पुंगळ्या व गोळ्या आढळून आल्या नाहीत. फिर्यादीने दिलेल्या दोन जबाबात विसंगती असल्याचा युक्तिवाद ॲड. अमित यादव यांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत जामीन मंजूर केला. ही घटना शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात घडली होती.