शर्यतीच्या बैल खरेदी व्यवहारावरून गोळीबार; एक गंभीर, सोमेश्वर कारखान्याच्या माजी अध्यक्षाच्या २ मुलांसह ५ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 12:09 PM2024-06-28T12:09:19+5:302024-06-28T12:09:43+5:30

व्यवहारावरून झालेल्या गोळीबारात डोक्यावर गोळी लागल्याने रणजित निंबाळकर हे गंभीर जखमी

Firing over the purchase of racing bulls A serious one a case against 5 persons including 2 sons of ex-chairman of Someshwar factory | शर्यतीच्या बैल खरेदी व्यवहारावरून गोळीबार; एक गंभीर, सोमेश्वर कारखान्याच्या माजी अध्यक्षाच्या २ मुलांसह ५ जणांवर गुन्हा

शर्यतीच्या बैल खरेदी व्यवहारावरून गोळीबार; एक गंभीर, सोमेश्वर कारखान्याच्या माजी अध्यक्षाच्या २ मुलांसह ५ जणांवर गुन्हा

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील निंबुत येथे सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी गोळीबार झाला असून यामध्ये तावडी ता. फलटण येथील रणजित निंबाळकर हे गंभीर जखमी झाले आहे. रात्री अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 
            
याबाबत अकिंता रणजित निंबाळकर मुळ रा. मु. पो तावडी ता.फलटण सध्या रा. स्वामी विवेकानंदनगर फलटण ता. फलटण जि. सातारा यांनी दाखल दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गौतम शहाजी काकडे, गौरव शहाजी काकडे दोघे रा. निंबुत ता.बारामती जि.पुणे व इतर 3 अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
         
पत्नी अंकिता निंबाळकर यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, रणजिंत निंबाळकर यांनी यातील गौतम काकडे यांना सुंदर नावाचा बैल ३७ लाखांना विक्री केला होता.  त्यापैकी ५ लाख हे ऍडव्हान्स म्हणून दिले होते. तर उर्वरीत रक्कम दि. २७ जून २०२४ रोजी नेण्यासाठी बोलाविल्याने त्यांच्या घरी निंबुत येथे माझे पती रणजित, मुलगी व मुलगा अंकुरण हे निंबुत येथे गेले होतो. गौतम काकडे यांनी माझे पतीस जिवे मारण्याचे उद्देशाने बोलविले होते .गौतम काकडे हे रणजित निंबाळकर याना म्हणाले की,  तुम्ही संतोष तोडकर यांना ‘मी तुम्हाला पैसे दिले नाहीत असे का सागिंतले? तुम्ही असे बोलायला नको होते’ मी तुम्हाला सकाळी पैसे देतो. तुम्ही आता स्टॅम्प पेपरवर सही करा असे बोलले. त्यावेळी माझे पती त्यांस तुम्ही माझे राहीलेले पैसे दया मी लगेच सही करतो आणि जर तुम्हाला व्यवहार पुर्ण करायचा नसेल तर तुमचे ५ लाख रूपये मी तुम्हाला परत देतो, माझा बैल मला परत दया असे बोलले. त्यानंतर आम्ही आमचे गाडीकडे निघालो. त्यावेळी गौतम काकडे माझे पतीस ‘तु बैल कसा घेवुन जातो तेच मी बघतो’ असे म्हणुन त्यांनी फोन लावुन पोरांनो तुम्ही वर या असे सांगितले. त्यानंतर त्यांनी त्यांचा भाउ गौरव यास देखील फोन करून बोलावुन घेतले. गौरव व अनोळखी 3 मुले तिथे आल्यावर गौतम काकडे हे आमच्याकडे पळत आले. व त्यांनी  गौरव व त्या अनोळखी 03 मुलांना ” हया सराला मारा लय बोलतोय हा “ असे म्हणाला. त्यावेळी गौरवच्या हातात काठी होती, ती काठी गौतम काकडे यांनी घेवुन तो मारण्यासाठी माझे पतीचे अंगावर धावुन जावून शिवीगाळ केली, त्यावेळी वैभव कदम हे गौतम काकडे यांना ” तुम्ही वाद घालु नका आपण उदया व्यवहारावर चर्चा करू “ असे म्हणुन त्यांना आडवत होते. अनोळखी 3 पोरांनी आम्हाला शिवीगाळ करीत असतांना गौरवने ” तु बैल कसा नेतो तुला जिवंत ठेवतच नाय “ असे म्हणुन त्याच्याकडे असणारे पिस्तुलमधुन माझे पतीच्या डोक्यात १ गोळी झाडली. गोळी लागताच माझे पती खाली पडले. 

Web Title: Firing over the purchase of racing bulls A serious one a case against 5 persons including 2 sons of ex-chairman of Someshwar factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.