दरोडेखोरांवर गोळीबार

By admin | Published: September 24, 2015 03:00 AM2015-09-24T03:00:27+5:302015-09-24T03:00:27+5:30

संशयित कारकडे चौकशीसाठी जात असतानाच दरोडेखोरांनी पोलिसांच्या अंगावर कार घालून पलायन केले. पोलिसांनी पाठलाग केला

Firing on robbers | दरोडेखोरांवर गोळीबार

दरोडेखोरांवर गोळीबार

Next

जेजुरी/ राजेवाडी : संशयित कारकडे चौकशीसाठी जात असतानाच दरोडेखोरांनी पोलिसांच्या अंगावर कार घालून पलायन केले. पोलिसांनी पाठलाग केला. त्यांच्या वाहनावर गोळीबारही केला. मात्र, चार संशयित दरोडेखोरांनी वाहन तेथेच सोडून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. ही घटना जेजुरी शहराच्या मुख्य चौकात बुधवारी (दि.२३ ) मध्यरात्री १ ते २ च्या दरम्यान घडली. पोलिसांनी घातक शस्त्रांसह वाहन जप्त केले आहे.
पोलीस कर्मचारी रणजित निगडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. रणजित निगडे आणि सहा. फौजदार डी. जी. भोसले शहर परिसरात गस्त घालीत होते. चौकात पांढऱ्या रंगाची कार संशयितरीत्या उभी होती. चौकशीसाठी पोलीस त्या वाहनाजवळ जात असतानाच गाडीतील चार इसमांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. नंतर सासवडकडे पलायन केले. प्ही घटना या पोलिसांनी सहा. पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना भ्रमणध्वनीवरून कळविली. त्यांनीही तत्काळ पोलीस ठाण्याला माहिती दिली. राज्यमार्गावर नाकाबंदी करण्यात आली. सासवडच्या दिशेने दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. हवेली विभागाच्या पोलीस कर्मचारी रौकी देवकाते, नाईक साठे यांनी सासवडमार्गे शिंदवणे घाटाकडे जाणाऱ्या दरोडेखोरांच्या वाहनाला घेरले. तर पाठीमागून जेजुरी पोलिसांचे पथक पाठलागावर असल्याने दरोडेखोरांनी वाघापूरमार्गे माळशिरसकडे मोर्चा वळवला. मात्र, आंबळे गावानजीक रेल्वे फाटक लागल्याने पुढे जाता येईना. त्यांची कार नजरेच्या टप्प्यात आल्याचे दिसताच रामदास शेळके यांनी वाहनावर आपल्या पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या. मात्र, अंधाराचा फायदा घेत दरोडेखोरांनी गाडी सोडून पलायन केले. विभागीय पोलीस आयुक्त तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते यांनी पोलीस ठाण्याला भेट देत माहिती घेतली. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे दरोड्याचा प्रयत्न असफल झाला. सहा. पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली शिवा खोकले, संतोष अर्जुन, संतोष मेढेकर तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Firing on robbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.