अज्ञात तरुणांकडून गोळीबार : हल्ल्यात महिला मृत्यूमुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 05:17 PM2018-11-21T17:17:59+5:302018-11-21T17:26:09+5:30
वडगावशेरी येथील आनंद पार्क चौकातील इंद्रायणी गृहरचना सोसायटी मधील ज्ञानदीप इमारतीत राहणाऱ्या एकता ब्रिजेश भाटी (वय ३४ )या महिलेवर सकाळी आठ वाजून १५ मिनिटांनी दोन तरुणांनी घरात घरात घुसून महिलेच्या छातीत गोळ्या झाडून हत्या केली.
पुणे (चंदननगर): वडगावशेरी येथील आनंद पार्क चौकातील इंद्रायणी गृहरचना सोसायटी मधील ज्ञानदीप इमारतीत राहणाऱ्या एकता ब्रिजेश भाटी (वय ३४ )या महिलेवर सकाळी आठ वाजून १५ मिनिटांनी दोन तरुणांनी घरात घरात घुसून महिलेच्या छातीत गोळ्या झाडून हत्या केली.
चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान दोन तरुण दुचाकीवरून पॅशन किंवा स्प्लेंडर या गाडीवरून येऊन इंद्रायणी गृहरचना सोसायटीतील धनदीप या इमारतीतील पहील्या मजल्यावर घुसले. यानंतर एकता ब्रिजेश भाटी व यांचे पती घरात बसलेले होते. या दोन 2 तरुणांनी दरवाजा वाजवल्यानंतर एकता भाटी यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच महिलेच्या छातीवर गोळ्या झाडून तरुण पसार झाले. याबाबत चंदननगर पोलिस परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासत असून कशातून हा प्रकार घडला आहे याचा तपास करीत आहेत.
यावेळी एसीपी समीर शेख ,शिरीष सरदेशपांडे,उत्तरविभागाचे सुनिल फुलारी,एसीपी गणेश गावडे,अंजुमन बागवान,खंडणी विरोधी पथकाचे रघुनाथ जाधव, चंदननगरचे पोलीस निरिक्षक राजेंद्र मुळीक, गुन्हे अन्वेषण विभागाचे विठ्ठल दरेकर यांनी परिसराची तपासणी सरू केली असुन सोसायटीतील सर्व सीसीटिव्ही कॉमेर तपासणीचे काम सुरू आहे. भाटी यांची खानावळ होती. ते विमाननगरमधील एका खाजगी कंपनीला जेवण पुरवत होते. पोलिसांनी मेसमध्ये काम करणाऱ्यांचे कर्मचाऱ्यांसोबतच त्यांचे मोबाईल फोन ताब्यात घेतले आहेत.